Alex Reginald Lawrence

 

Dainik Gomantak

गोवा

काँग्रेस लोकहितवादी निर्णय घेण्यास अपयशी ठरल्यानेच तृणमुलमध्ये प्रवेश

जनविरोधी प्रस्थापितांना आळा घालण्यात आम्ही एकत्रितपणे अपयशी ठरलो आहोत असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोविड माहामारी, मायनिंग बंदी, पर्यावरणावर केले जाणारे आघात अशा बाबतीत काँग्रेस ठोस निर्णय घेण्यास अपयशी ठरल्याने गोवेकरांच्या प्रश्नावर आवाज उठवून त्यांना न्याय द्यायचा असेल तर दुसऱ्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही. असे वाटल्यानेच आपण तृणमुल काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी म्हटले आहे.

कुडतरीच्या मतदारांना लिहिलेल्या खुल्या पत्रात रेजिनाल्ड यांनी, 'हा अवघड वाटणारा निर्णय घेतल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. जेव्हा मला कळले की तृणमुलमध्ये सामील झाल्यामुळे माझ्या शेकडो गोव्यातील बंधू-भगिनींना बळ मिळेल, तेव्हा मला उत्साह आणि आत्मविश्वास वाटला. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असे त्यांनी म्हटले आहे.

माझ्यासाठी राजकारण (Politics) हे केवळ लोकांच्या गरजा आणि आकांक्षांशी जुळणारी पावले उचलण्याचे माध्यम आहे. माझा 'ट्रॅक रेकॉर्ड ' चांगला असूनही, माझा आवाज दाबला गेला. मी केवळ कुडतरीच्या सर्व लोकांसाठीच नाही, तर माझ्या सर्व गोव्यातील (goa) बंधू-भगिनींसाठी लढलो. तथापि, अत्यंत अनिर्णयकारी राजवटीमुळे, जनविरोधी प्रस्थापितांना आळा घालण्यात आम्ही एकत्रितपणे अपयशी ठरलो आहोत असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

काँग्रेस नेत्यांना दोष देताना, 'ज्यांनी माझ्या या ठाम राजकीय निर्णयाची अवहेलना केली आहे आणि माझी बदनामी चालवली आहे, हे तेच लोक आहेत ज्यांनी त्यांच्या राजवटीचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निर्णायक पावले उचलण्याच्या, माझ्या प्रयत्नांना अडथळा आणला.

मी आमच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून गांभीर्याचा अभावामुळे, केवळ गोमंतकीयांच्याअपेक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरलो नाही तर महामारीचा रोग, खाण बंदी आणि आमच्या वारशा स्थळांवर हल्ला यासारख्या अत्यंत दुःखाच्या काळात, गोव्याला सवरण्यात अपयश आले. आणि म्हणूनच, मो काँग्रेस (Congress) सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. तृणमुलच्या (Trinamool) माध्यमातून मी तूमच्या सर्व अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न करीन मात्र त्यासाठी मला आणि तृणमुलला खंबीर पाठींबा द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT