काँग्रेसला बळकटी देण्यासाठी अमन लोटलीकरांचा काँग्रेस प्रवेश

थिवीचे तरुण उद्योजक तसेच समाजसेवक अमन लोटलीकर यांनी काँग्रेसमध्ये समर्थकांसह प्रवेश केला आहे.
Goa Politics

Goa Politics

Dainik Gomantak

पणजी: थिवीचे तरुण उद्योजक तसेच समाजसेवक अमन लोटलीकर यांनी काँग्रेसमध्ये समर्थकांसह प्रवेश केला आहे. राज्याबाहेरून आलेल्या राजकीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांबरोबर युती करून स्वाभिमानी गोमंतकियांना लाचार बनवण्याचा तसेच भाजपने फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला बळकटी देण्यासाठी प्रवेश केल्याची माहिती लोटलीकर यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Goa Politics</p></div>
भाजप सरकारची कारकीर्द भ्रष्ट, असंवेदनशील आणि विश्‍वासघाताची: चोडणकर

पणजीत काँग्रेस (Congress) भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, उपाध्यक्ष आग्नेल फर्नांडिस व उपाध्यक्ष बाबी बागकर तसेच इतर पदाधिकारी उपस्‍थित होते. चोडणकर यांनी अमन लोटलीकर यांना प्रवेश दिला तर कामत यांनी त्यांचे स्वागत केले.

काँग्रेस पक्ष हा तरुणांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे हे गोवाभर कळून चुकले आहे. होतकरू तसेच समाजकार्यात असलेल्या अशा तरुणांना पक्षाने न्याय दिला आहे. लोटलीकर हे स्वकष्टाने व्यवसायात आले असून त्यांनी राजकारणापासून दूर राहून लोकांना मदत तसेच गरजवंताना हातभार लावला आहे. त्यांच्या या कामाला काँग्रेसच न्याय देऊ शकतो हे त्यांनी ओळखले व योग्य निर्णय घेतल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Goa Politics</p></div>
आजपासून पणजीतील पाणीपुरवठा सुरळीत...

गोव्याच्या बचावासाठी राज्यातील राजकारणात नसलेल्या युवा पिढीने पुढे येण्याचे आवाहन काँग्रेसने केले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक युवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपला पराभूत करू शकणारा काँग्रेस हा राज्यातील एकमेव पक्ष आहे हे आता युवा पिढीलाही कळून चुकले आहे. भाजपने गेले दशकभर करत आलेला अन्याय लोकांनी सोसला मात्र आता भाजपला योग्य तो धडा शिकवण्याचे गोमंतकियांनी ठरविले आहे असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com