Goa Birth Rate
Goa Birth Rate Dainik Gomantak
गोवा

Goa Birth Rate Falling: चिंताजनक! गोव्यात जन्मदरांत होतेय घट; शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगली स्थिती

Akshay Nirmale

Goa Facing Serious Issue of Birth Rate Falling Significantly: गोव्यात जन्मदरामध्ये सातत्याने घट होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता. त्यातून ही बाब समोर आली आहे.

गत पाच वर्षांचा विचार करता, गोव्याचा जन्मदर 2017 मध्ये 13.3 प्रति हजार वरून 2021 मध्ये 9.7 इतका घसरला आहे. विशेष म्हणजे, देशातील सर्वात कमी प्रजनन दर गोव्यातच आहे. गोव्यातील महिला दोनपेक्षा कमी अपत्ये जन्माला घालतात.

आर्थिक पाहणी अहवाल 2023 नुसार, गोव्यातील जन्मदर ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागात अधिक वेगाने घसरत चालला आहे. 2020 मध्ये जन्मदर हा दर हजार लोकसंख्येमागे 11.6 इतका नोंदवला गेला होता, तथापि, 2021 मध्ये तो कमी झाला आणि 9.7 प्रति हजार लोकसंख्येवर राहिला.

जन्मदर दर प्रत्येक 1,000 लोकसंख्येच्या पाठीमागे वर्षभरात होणाऱ्या जन्माची संख्या दर्शवतो. 2020 ते 2021 या काळात ही घसरण आणखी तीव्र असल्याचेही यावरून दिसून येते. अर्थात 2020 नंतरचे वर्ष हे कोरोना महामारीचे वर्ष आहे, हे विसरूनही चालणार नाही.

शहरी भागात, प्रति हजार जन्मदर 2017 मध्ये 12.8 वरून 2021 मध्ये 9 वर घसरला आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती थोडीशी का होईना, अधिक चांगली दिसते. 2017 मध्ये ग्रामीण भागातील जन्मदर प्रति हजार लोकसंख्येमागे 14.4 होता तर 2021 मध्ये तो 11.7 इतका राहिला.

गोव्याचा समावेश देशातील सर्वात कमी प्रजनन दर असलेल्या 9 राज्यांमध्ये होतो. गोव्यातील स्त्री सरासरी 1.7 मुले जन्माला घालतात.

उच्च शिक्षण आणि उच्च उत्पन्नाचा स्तर जन्मदर कमी असण्याशी, सामाजिक परिस्थितीशी जोडला जातो. त्यामुळे जन्मदर कमी असण्याला सकारात्मरित्याही घेतले जाते. पण त्यामुळे वृद्धांची लोकसंख्या वाढताना दिसते.

वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि घटता प्रजनन दराचा परिणाम उत्पादक वयोगटावरील आर्थिक भार वाढवण्याचे काम करत असतात.

वृद्ध लोकसंख्येत गोवा दुसऱ्या स्थानी

2011 च्या जनगणनेनुसार, केरळनंतर गोवा हे वृद्ध लोकांच्या लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. गोव्यातील 11 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 60 पेक्षा जास्त वयाची आहे. गोव्यात 0 ते 9 वयोगटातील लोकसंख्या सर्वात कमी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT