Goa School Student Dainik Gomantak
गोवा

Goa Mid Day Meal: चिंताजनक! राज्यातील 55 टक्के शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच नाही!

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa School Student Health: गोव्यात इयत्ता 1 ते 8 वी मधील एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त 45 टक्के विद्यार्थ्यांचीच वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. सन 2022-23 दरम्यान केंद्र सरकारच्या माधान्ह भोजन योजनेतून ही तपासणी करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, उर्वरीत 55 टक्के शालेय विद्यार्थ्यांची तपासणी न होणे हे चिंताजनक चित्र आहे.

(Mid Day Meal Scheme)

या योजनेनुसार, मुलांना शाळांमध्ये वार्षिक आरोग्य तपासणी करावी लागते आणि त्यात कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज असेल तर तसे शिक्षकांना आणि पालकांना कळवले जाते.

राज्य सरकारच्या माहितीनुसार केवळ नोंदणी केलेल्या 45 टक्के विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली आहे. तर लोह फॉलिक ऍसिड (IFA) डोस 77 टक्के आणि जंतनाशक गोळ्या 83 टक्के नोंदणीकृत विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत.

तथापि, प्रकल्प मंजूरी मंडळाने (PAB - प्रोजेक्ट अॅप्रुव्हल बोर्ड) नोंदणी केलेल्या सुमारे 55 टक्के विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे 100 टक्के कव्हरेज अपेक्षित आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, मुलांच्या आरोग्याबात शिक्षकांना अधिक जागरूक करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरजही व्यक्त केली आहे.

शिक्षकांची क्षमता वाढवून मुलांचा अशक्तपणा, दाताची समस्या, विद्यार्थ्यांची वार्षिक उंची आणि वजन याचे निरीक्षण करता येऊ शकते, असे अभ्यासात म्हटले आहे. डॉक्टरांनी भरलेली हेल्थ कार्ड जपून ठेवणे, आवश्यकता वाटल्यास पालकांना कळवणे, ही कामे शिक्षकांना करता येतील.

अॅनिमियाशी लढा देण्यासाठी माध्यान्ह भोजनात लोह आणि आयोडीनयुक्त मीठ वापरावे, व्हिटॅमिन A आणि D सह असलेल्या पदार्थांसह, चांगले ते वापरावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय कृषी मंत्रालय माध्यान्ह भोजनासाठी सवलतीत चना डाळ देईल, त्याद्वारे विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतील याची खात्री होईल, असेही PAB ने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT