Goa BJP President Sadanand Shet Tanavade
Goa BJP President Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak

Sadanand Tanavade: पक्षाने सांगितल्यास राज्यसभेवर जाईन! दक्षिण गोव्यातील लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकू...

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे
Published on

Sadanand Shet Tanavade: गोव्यातील राज्यसभेच्या जागेवर भाजपचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा गेल्या काही काळात राज्यात सुरू झाली आहे. दरम्यान, पक्षाने संधी दिल्यास राज्यसभेवर जाण्यास तयार आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले आहे.

Goa BJP President Sadanand Shet Tanavade
Goa Hinterland Tourism: गुड न्यूज! गोव्याच्या अंतर्गत भागातील पर्यटनात मोठी वाढ

दरम्यान, दक्षिण गोव्याची लोकसभेची जागा जिंकण्याचा विश्वासही तानावडे यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याची जागा किमान ३० हजाराच्या मताधिक्क्याने जिंकू, असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला आहे.

गत लोकसभा निवडणूकीत उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन निवडून आले होते. आगामी वर्षातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने यापुर्वीच तयारी सुरू केली आहे.

त्याच तयारीचा भाग म्हणून केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी फोंडा येथे सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. तसेच दोन्ही जागा भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता.

Goa BJP President Sadanand Shet Tanavade
Goa Monsoon: गोव्यात बीचवर पोहण्यास बंदी; वॉटर स्पोर्ट्सही बंद

दरम्यान, गोव्यातून राज्यसभेवर गेलेले भाजपचे विद्यमान खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे. तेंडुलकर यांचा राज्यसभेचा 6 वर्षांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपत आहे. 31 जुलै 2017 रोजी ते राज्यसभेवर निवडून गेले होते. राज्यात भाजप सत्तेत आहे.

सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ भाजपकडेच आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. राज्यसभेची ही निवडणूक 23 जुलै रोजी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com