Anjuna Crime News: कर्नाटकच्या पर्यटकांच्या रूममध्ये घुसून चोरली सोनसाखळी; पोलिसांनी अवघ्या दोन तासात लावला छडा

हणजुणे येथील हॉटेलमधील घटना
Anjuna Crime
Anjuna CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Anjuna Chain Snatching: उत्तर गोव्यातील हणजुणे येथील एका हॉटेलमध्ये पर्यटकाच्या रूममध्ये घुसून चोरी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हणजुणे पोलिसांनी केवळ दोन तासांमध्ये या चोरीचा छडा लावला आहे.

Anjuna Crime
Goa Monsoon: गोव्यात बीचवर पोहण्यास बंदी; वॉटर स्पोर्ट्सही बंद

हणजुणे येथील या हॉटेलमध्ये कर्नाटकातील बंगळुरूचे एक कपल उतरले होते. गोव्यात सुट्टीसाठी ते आले होते.

आपले सामान रूममध्ये ठेऊन हे कपल बीचवर फिरायला गेले होते. ही संधी साधून हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या रूममध्ये घूसून चोरी केली.

यात सोन्याच्या चेनसह इतर वस्तू चोरल्या. त्याची एकूण किंमत १ लाख २० हजार ३५० रूपये इतकी होते.

हे दाम्पत्य रूमवर परतल्यावर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपासास सुरवात केली. विशेष म्हणजे अवघ्या दोन तासात पोलिसांनी संशयित चोरट्याला अटक केली.

Anjuna Crime
Goa Cyclone Biparjoy: ‘बिपरजॉय’मुळेच गोव्‍यात सध्‍या ऊन-पावसाचा खेळ : एम. रमेशकुमार

संशयित आरोपीचे नाव अतुल कुमार बैस (वय २३ वर्षे) असून तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. ज्या हॉटेलमध्ये चोरी झाली तेथे बैस हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. तो गावाकडे पळून जात असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत बैसने चोरीची गुन्ह्याची कबुली दिली.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापशाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा तपास केला.

यात पीएसआय साहिल वारंग, धीरज देविदास आणि पोलीस हवालदार रामा परब, सत्येंद्र नसनोडकर, लक्ष्मण संवलदेसाई आणि रूपेश आजगावकर यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com