akasa airlines | Mopa International Airport | Manohar International Airport Dainik Gomantak
गोवा

Akasa Air : अकासाच पहिलं विमान बंगळुरूहून मोपावर लॅन्ड

कंपनीच्या नेटवर्कमध्ये जोडले जाणारे गोवा भारताच्या पश्चिम भागातील तिसरे शहर

गोमन्तक डिजिटल टीम

Akasa Air : नवे अकासा एअर देशाच्या नेटवर्कमधील १२ वे ठिकाण म्हणून आज बुधवारपासून गोव्यातून मोपा विमानतळावरून आपली विमानसेवा सुरू करत आहे. (Manohar International Airport)

दरम्यान, अकासा एअरचे बंगळुरू ते गोवा QP1392 विमान गोव्यातील मोपा विमानतळावर 11 वाजता उतरले. अकासा विमान कंपनीने विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पदभरती सुरु केली होती.

आजपासून अकासा एअरने गोव्यातून मोपा विमानतळावरून आपली विमानसेवा सुरू केली आहे. मुंबई-गोवा-बंगळुरू अशी ही दुहेरी सेवा असेल, अशी माहिती अकासा एअरचे सह-संस्थापक व मुख्य व्यवसाय अधिकारी प्रवीण अय्यर यांनी दिली.

अय्यर म्हणाले, अकासा एअरने अलीकडेच हैदराबाद-बेंगळुरू आणि हैदराबाद-गोवा मार्गांवर २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दैनंदिन उड्डाण ऑफर करत असलेल्या नेटवर्कवरील १३ वे डेस्टीनेशन म्हणून हैदराबादची घोषणा केली आहे.

मुंबई आणि पुणेनंतर गोवा हे विमान कंपनीच्या नेटवर्कमध्ये जोडले जाणारे भारताच्या पश्चिम भागातील तिसरे शहर आहे.

एअरलाइनचे सह-संस्थापक आणि मुख्य विपणन आणि अनुभव अधिकारी बेल्सन कौटिन्हो म्हणाले, "अकासा गोव्यात आपले पंख पसरवत असल्याने आम्ही आमच्या मानवी आणि सर्वसमावेशक प्रवासाच्या अनुभवाने आनंदी आठवणी निर्माण करण्याची आशा करतो" असे सांगितले.

इंडिगो व गो फर्स्ट या दोन विमान कंपन्यांनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर अशा महत्वाच्या ठिकाणांवरुन येणारी आपली विमाने दाबोळीवरुन मोपावर विमान सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. 

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उतरवण्याचा मान मिळविलेल्या इंडिगो कंपनीने ‘मोपा’वरून आठवड्यात 168 उड्डाणे केली जातील, असे सांगून देशातील प्रमुख आठ शहरांना जोडत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी ‘इंडिगो’ कंपनीने केली होती.

‘इंडिगो’कडून मोपा विमानतळावरून आठवड्याला 168 उड्डाणे होणार असून देशांतर्गत 8 स्थळांमध्ये हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

SCROLL FOR NEXT