Zuari Bridge: गुगल मॅप गंडलंय! गोवा एअरपोर्टने सांगितले चूक दुरूस्त करा

झुआरी पुलावरील सुरू असलेली वाहतूक गुगलवर दाखवत नसल्याने प्रवाशांना मोठा पल्ला पार करून पणजी गाठावी लागत आहे.
Google Map And  Goa Airport
Google Map And Goa AirportDainik Goamantak

Zuari Bridge: बऱ्याचवेळा आपण अनोळखी ठिकाणी प्रवास करत असतो, आपल्याला रस्ते माहित नसतात त्यामुळे इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅपची (Google Map) मदत घेतली जाते. पण गुगलही अनेकवेळा वेगळाच रस्ता दाखवते त्यामुळे प्रवाशांची फसगत होते. असाच त्रास सध्या गोव्यात येणाऱ्या प्रवाशांना होत आहे.

दाबोळी विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना झुआरी पुलावरील सुरू असलेली वाहतूक गुगलवर दाखवत नसल्याने प्रवाशांना मोठा पल्ला पार करून पणजी गाठावी लागत आहे. (Dabolim Airport To Panaji Via Zuari Bridge)

Google Map And  Goa Airport
Pilerne Burger Fire: पिळर्णच्या 2km परिघातील नागरिकांसाठी Advisory जाहीर, मदतीसाठी यांना संपर्क साधा

गोवा एअरपोर्टने दाखवून दिली चूक

गोवा (Goa Airport) आंतरराष्ट्रीय विमानतळ, दाबोळी ते पणजीला झुआरीमार्गे (Dabolim Airport To Panaji Via Zuari Bridge) जाणारा रस्ता गुगल मॅपवर दाखवत नसल्याने अनोळखी प्रवाशांना दुसरा रस्त्याचा वापर करावा लागत आहे.

गुगल मॅपवर दाबोळी ते पणजी टाकवल्यास फोंडा मार्गे 61 कि.मीचा रस्ता दाखवत आहे. त्यामुळे अनेकांची दिशाभूल होत आहे. यासाठी तब्बल दीड तास वेळ दाखवत आहे. झुआरीमार्गे दोन्ही बाजुने जाणारी वाहतूक सुरू असताना गुगल लांब पल्ल्याचा रस्ता का दाखवत आहे. असा प्रश्न गोवा एअरपोर्टने उपस्थित केला आहे.

Google Map And  Goa Airport
Goa Agriculture: गोव्यातील ऊस उत्पादकांचा सरकारकडून विश्वासघात

दरम्यान, झुआरीमार्गे जाणारा रस्ता केवळ 26 कि.मी असून, या मार्गावरून पणजीसाठी लागणारा वेळ देखील केवळ 37 मि. आहे. त्यामुळे मॅपमध्ये योग्य सुधारणा करून घ्यावा असा सल्ला गोवा एअरपोर्टने गुगल मॅपला (Google Map) दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com