Runway Canva
गोवा

Mopa Airport: टेकऑफसाठी विमान गेले टॅक्सीमार्गावर..! मोपा येथील घटना; ट्रॅफिक कंट्रोलरच्या सजगतेमुळे टळला मोठा अपघात

Mopa Airport Incident: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीऐवजी टॅक्सीवेवरुन उड्डाण करण्याच्या प्रयत्नात होऊ शकणारा अपघात टळला आहे. गुरुवारी पहाटे घडलेली ही घटना आज संकेतस्थळावर याची माहिती दिली जाताच उघड झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport Flight Taxiway Incident

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीऐवजी टॅक्सीवेवरुन उड्डाण करण्याच्या प्रयत्नात होऊ शकणारा अपघात टळला आहे. गुरुवारी पहाटे घडलेली ही घटना आज संकेतस्थळावर याची माहिती दिली जाताच उघड झाली आहे.

संकेतस्थळावरील माहितीनुसार, एअर इंडियाच्या पायलटांनी चुकून रनवेऐवजी टॅक्सीवेवरून टेकऑफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क एअर ट्रॅफिक कंट्रोलरने ही चूक लक्षात आणून दिल्यामुळे मोठा अपघात टळला.

एअर इंडियाचे विमान गोवा ते हैदराबाद या प्रवासासाठी तयार होत होते. हे विमान एअरबस प्रकाराचे होते. विमानाने रनवे ऐवजी टॅक्सीवे वरून टेकऑफ करण्याचा प्रयत्न केला. टेकऑफच्या वेळी विमानाचा वेग १०० नॉट्सपेक्षा जास्त होता आणि विमान उड्डाणासाठी सज्ज होत असताना हवाई वाहतूक नियंत्रकाने त्वरित सूचना दिली. पायलटांनी तातडीने टेकऑफ थांबवले आणि विमान सुरक्षितपणे थांबवण्यात आले.

त्यानंतर रनवेचा वापर करून विमानाला टर्मिनलवर परत आणण्यात आले. एअर इंडियाने हे उड्डाण रद्द केले. या घटनेत कोणत्याही प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना इजा झाली नाही.

भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालयाने या घटनेची गंभीर सुरक्षा उल्लंघन म्हणून नोंद घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे. एअर इंडियाला या घटनेवरील सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सजगतेमुळे मोठा अपघात टळल्याचे उदाहरण ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

Astrology: लग्नात अडचणी येतायेत? 'हे' अशुभ ग्रह ठरतात अडथळा, काय सांगते तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती? जाणून घ्या

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT