Death on Railway Route Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Police : मडगावात वायू दलाच्या कर्मचाऱ्याने रेल्वेखाली संपवली जीवनयात्रा; पत्रात लिहीले...

पोलिसांना युवकाचा मोबाईल आत्महत्या करण्याआधीचे पत्र सापडले.

दैनिक गोमन्तक

मडगावात केरळमधील 34 वर्षीय वायू दलाच्या कर्मचाऱ्याने रेल्वेखाली झोपून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार रविवारी पहाटे 4 च्या सुमारास घडला आहे. दरम्यान युवकाने आत्महत्या का केली याबाबत शोध घेण्यात आला.

(Air Force personnel ended his journey under the train in Margao)

पोलिसांना युवकाचा मोबाईल आत्महत्या करण्याआधीचे पत्र सापडले. हे पत्र मल्याळम भाषेत असल्याने पोलिसांनी मल्याळम भाषा येणाऱ्या व्यक्तीकडून पत्रातील मजकूर जाणून घेतला. कोकण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रातून हे उघड झाले की युवकाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागत होता आणि यातून त्याने आत्महत्या केली आहे.

मृत युवकावर कर्ज होते, त्या दबावाखाली त्याने आत्महत्या केली. युवक मूळचा केरळचा रहिवासी होता असून तो काही कामासाठी दिल्ली येथे गेला होता. तो निजामुद्दीन त्रिवेंद्रम रेल्वेतून प्रवास करत होता.

कोकण रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रकरणी काही वायू दलातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT