Two persons from Tamil Nadu arrested For theft of rented bike
Two persons from Tamil Nadu arrested For theft of rented bike Dainik Gomantak

Thief Arrested : भाड्याच्या दुचाकी चोरीप्रकरणी तामिळनाडूतील दोघांना अटक

ळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्कर बास्करा आणि निवेथन वेणुगोपाल आर हे दोघेही चेन्नईचे रहिवासी आहेत.
Published on

कळंगुट : गोव्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या परिवाहनासाठी गोव्यात खाजगी दुचाकी भाड्याने देण्याची यंत्रणा आहे. परंतु भाड्याने दिलेल्या दुचाकीच चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भाड्याने घेतलेल्या दुचाकी चोरट्यांनी पळविल्याप्रकरणी तामिळनाडूतील दोघांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्कर बास्करा आणि निवेथन वेणुगोपाल आर हे दोघेही चेन्नईचे रहिवासी आहेत. त्यांनी दुचाकी भाड्याने घेतल्या होत्या आणि नंतर त्यांचा शोध लागला नाही.

(Two persons from Tamil Nadu arrested For theft of rented bike)

Two persons from Tamil Nadu arrested For theft of rented bike
Goa Petrol-Diesel Price : जाणून घ्या आजचे गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

त्यानंतर वाहन मालकाने दिलेल्या तक्रारीनंतर कळंगुट पोलिसांनी तपास करून दोघांचा शोध घेऊन पुण्याला रवाना केले. त्यानंतर दोन्ही आरोपींना गोव्यात आणण्यासाठी पोलिसांचे पथक पुण्याला रवाना करण्यात आले होते.

त्यांना सोमवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, वेर्णा येथून आरोपी फैयाज रफिक अहमद आणि नदीम मलिक यांनी दुचाकी लंपास केली होती. या दुचाकीसह मोले चेकनाक्यावर गस्त घालण्यासाठी असलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. कुळे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची गाडी जप्त करण्यात आली आहे. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com