AI Education Dainik Gomantak
गोवा

AI Education: विद्यार्थ्यांसाठी एआयचा नवा मंच! 'आयाम क्लब'मधून 12 सर्जनशील कौशल्यांचे प्रशिक्षण

AI Based Skill Development: विद्यार्थ्यांसाठी एआय आधारित कौशल्य विकास मंच, ‘आयाम क्लब’द्वारे १२ सर्जनशील क्षेत्रांचे प्रशिक्षण : आवडीनुसार रोजगार संधींची ओळख

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विद्यार्थ्यांमधील सर्जनशील क्षमता विकसित करून त्यांना भविष्यातील रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींची ओळख करून देण्यासाठी गोव्यातील ‘नॉवमॅजिन एडुव्हर्स प्रा. लि.’ या स्टार्टअपने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘आयाम क्लब’ हा शिक्षण आणि कौशल्य विकास मंच विकसित केला आहे. या मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनिवडी आणि क्षमता ओळखून त्यानुसार कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

गोमंतकीय विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यासाठी कंपनी आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्यात गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बांदेकर उपस्थित होते.

‘आयाम क्लब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीवर १२ परस्परांशी संबंधित सर्जनशील विषयांचे प्रशिक्षण घेता येईल. विद्यार्थ्यांचे कलागुण आणि क्षमता जाणून घेण्यासाठी विशेष चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर आव्हानाधारित शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अभिप्रायामुळे विद्यार्थ्यांना स्वतःची आवड आणि कौशल्ये ओळखता येतील.

या उपक्रमात केवळ सैद्धांतिक शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक स्वरूपाची कामेही दिली जातील. त्यातून सर्जनशील कौशल्यांचा व्यावसायिक क्षेत्रात कसा उपयोग होतो, तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. उद्योजकतेच्या संधींची ओळखही त्यांना लहान वयातच होईल.

शाळा-महाविद्यालयांत मंच सुरू होणार

हा मंच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यासाठी अतिरिक्त पायाभूत सुविधांची गरज नाही. तसेच विद्यमान अभ्यासक्रमात बदल न करता नियमित शिक्षणाला पूरक म्हणून त्याचा वापर करता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कौशल्य विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: ऑटोग्राफ देण्यासाठी गेला अन्... चाहत्यांनी थेट कृणाल पांड्याच्या अंगावर भिरकावला बूट; थोडक्यात बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ

Ro Ro Ferry Boat: गोव्यात निवडणुकीपूर्वी 2 नव्या रो-रो फेरीबोटी सेवेत; वॉटर मेट्रोचे काय?

FTII Training: चित्रपट क्षेत्रात करिअरसाठी गोव्यातच प्रशिक्षणाची संधी, मनोरंजन संस्थेचा ‘एफटीआयआय’सोबत करार

Junta House Case: 'जुन्ता हाऊस' प्रकरणात सरकारला हायकोर्टाचा झटका; अवर सचिवांना दंड भरण्याचे आदेश

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडे कर्मचाऱ्यांच्या 73 मोठ्या मागण्या! 6% वार्षिक पगारवाढ, 50% DA मर्जर अन् 5 प्रमोशन; सरकार देणार मंजुरी?

SCROLL FOR NEXT