Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: ‘आग्वाद इंटरॅक्टिव्ह’ पर्यटकांसाठी खुले

Goa Tourism: पर्यटनमंत्र्यांनी केले उद्‍घाटन: आधुनिक तंत्राद्वारे ऐतिहासिक वारशाचे प्रदर्शन

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: आग्वाद इंटरॅक्टिव्ह म्युझियम या संग्रहालयाचे आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. या द्वारे गोव्याच्या भूमीत घडलेला संघर्ष, गोमंतकीय जनता आणि भूमीतील ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना, घडामोडींचे प्रदर्शन पर्यटकांना तसेच भेट देणाऱ्यांना घडणार आहे.

यावेळी आमदार मायकल लोबो, पर्यटन संचालक सुनील अंचिपका, टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शहा, वॉटरफ्रंट एक्स्पिरिएन्सिसचे सीईओ नवीन चोप्रा आदी मान्यवर उपस्थित होते. सदर संग्रहालय ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याच्या आवारात असून याद्वारे सन १६१२ पूर्वीच्या गोव्याच्या इतिहासाचा मागोवा घेता येणार आहे.

या संग्रहालयात आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकारातून हे संग्रहालय साकारले असून संकल्पना ऊर्जा इंटरॅक्टिव्ह ॲंड डेल्टा टेक्नॉलॉजीसची आहे. आग्वाद किल्ल्यात स्थित तुरूंगातील सेलचा या संग्रहालयासाठी यथायोग्य वापर करण्यात आला आहे. तीन सेलमध्ये गोव्याच्या जडणघडणीचे पैलू मांडण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT