शेती Dainik Gomantak
गोवा

हरमल येथील शेती खाऱ्या पाण्यामुळे नापीक

दैनिक गोमन्तक

हरमल: पालये हद्दीतील मालखाजन-मिर्झेलवाडा मानशीची दुरुस्ती न झाल्यामुळे खारे पाणी शेतीत घुसत आहे त्यामुळे शेतकरी पिके घेण्यापासून वंचित आहेत. साधारण चार पिके घेऊ न शकल्याने जमीन असूनही उपयोग नसल्याने परंपरागत शेतकरी हवालदिल झाले आहेत, त्यांचे न्याय्य हक्क डावलण्याचे कटकारस्थान कोणीही करू नये. दुरुस्ती काम लांबणीवर टाकण्याचे प्रयोजन काय,अशी विचारणा सामाजिक कार्यकर्ते नामदेव तुळसकर यांनी केली आहे.

सदर मानशीचे दुरुस्ती काम हाती घेत नसल्याच्या निषेधार्थ तुळसकर यांच्या उपोषणाला तीन महिने पूर्ण झाले. त्यावेळी जलसिंचन खात्याने तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, प्रत्यक्षात काम सुरूच केले नाही, असे तुळसकर यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात तुळस्कर यांनी उपोषणाचे शस्त्र हाती घेत सरकारी खात्याचे लक्ष वेधून घेतले होते.त्यावेळेस संयुक्त मामलेदार अक्षया आमोणकर व जलसिंचन खात्याचे अभियंते सत्यवान नाईक व अभियंते अशोक हरमलकर तसेच सरपंच उदय गवंडी, पंच तारिका तारी, माजी सरपंच गोपाळ परब यांच्या उपस्थितीत मानशीचे काम शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

अद्याप कामाला चालना न मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन करू, असे तुळसकर यांनी सांगितले. पालये मानशीच्या प्रश्नी शेतकऱ्यांना आपले पूर्ण सहकार्य असून शेतकऱ्यांचा न्याय हक्क कोणीही हिरावून घेऊ नये. मानशी संवर्धन समिती स्थापन करतेवेळी पूर्ण सहकार्य केले होते, मात्र शासनाने कृती करावी व शेतकऱ्यांचा दुवा घ्यावा, असे गवंडी यांनी सांगितले.

मालखाजन-मिर्झालवाडा मानशीचे दरवाजे मोडकळीस आले होते. ते दरवाजे सताड उघडे राहत असल्याने खारे पाणी शेतात घुसून शेतजमीन नापीक बनली आहे.त्याचा फटका शेकडो शेतकऱ्यांना बसला आहे.

- नामदेव तुळसकर

आचारसंहितेमुळे कामे खोळंबली होती. सरकार स्थापन झाले की,कामे मार्गी लागतील,खात्याकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे.

- अशोक हरमलकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco Sensitive Zone: आम्ही करायचे काय..? म्हाऊस ग्रामसभेत अतिसंवेदनशील क्षेत्राला विरोध

'Heritage Master Plan तयार करा अन्यथा..'; जुने गोवे वाचवण्यासाठी सेव्ह ओल्ड गोवा ॲक्शन समितीचा पुढाकार

Truck Terminal: फोंड्यात शेकडो वाहनांची ये-जा, पार्किंगसाठी जागाच नाही; टर्मिनलच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

Crocodile In Goa: करमळी तळ्यात '१०० हून अधिक मगरी' असल्याचा दावा! स्थानिक चिंतातुर

Goa Cricket: पणजीत रंगणार गोवा विरुद्ध नागालँड क्रिकेट सामना; १८ वर्षांनंतर बांदोडकर मैदानावर रणजी लढत

SCROLL FOR NEXT