Boat owner manjunath harikant murder case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: बोटमालकाच्या खूनप्रकरणी दोन मजुरांना अटक, आगशी पोलिसांकडून चौकशी सुरू; खुनामागील कारण अजूनही अस्पष्ट

Boat owner manjunath harikant murder case: आगशी पोलिसांनी बोटमालक मंजुनाथ हरिकांत यांच्या खूनप्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करत नागपूर येथील दोन मजुरांना अटक केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: आगशी पोलिसांनी बोटमालक मंजुनाथ हरिकांत यांच्या खूनप्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करत नागपूर येथील दोन मजुरांना अटक केली आहे. या दोघांवर हरिकांत यांच्या खुनात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय असून त्यांना ताब्यात घेऊन आगशी पोलिस स्थानकात चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मंजुनाथ हरिकांत यांच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. मासे भरलेली त्यांची बोट किनाऱ्याला लागली होती. मात्र, ते बेपत्ता होते. त्यानंतर जखमा असलेला त्यांचा मृतदेह नंतर सापडला होता.

पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू करत घटनास्थळावरील पुरावे, संशयितांच्या हालचाली तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान नागपूर येथील दोन मजुरांवर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून खुनामागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

दरम्यान, या गुन्ह्यात कोणते हत्यार वापरण्यात आले, खुनाचे कारण आर्थिक वाद, वैयक्तिक वैमनस्य की अन्य काही होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अटक करण्यात आलेल्या संशयितांची सखोल चौकशी सुरू असून त्यातून या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगशी परिसरात चर्चेला उधाण!

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयितांना आगशी पोलिस स्थानकात आणण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासाच्या पुढील टप्प्यात खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करणे, गुन्ह्यामागील हेतू निश्चित करणे आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. या प्रकरणामुळे आगशी परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT