Punav Utsav Goa Dainik Gomantak
गोवा

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Devachi Punav: दर तीन वर्षांनी पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी ही ‘देवाची पुनव’ म्हणजे आगरवाडा आणि पार्से गावांच्या ऐक्याचे प्रतीक मानली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी/पेडणे : आगरवाडा येथील श्री सातेरी आणि पार्से येथील श्रीदेवी भगवती या भगिनींदरम्यान कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने साजरा होणारा ‘देवाची पुनव’ हा पारंपरिक आणि भक्तिभावाने नटलेला उत्सव यंदा मोठ्या जल्लोषात पार पडला.

मुसळधार पावसाच्या सरींनी थोडा व्यत्यय आणला असला तरी भक्तांच्या उत्साहात किंचितही खंड पडला नाही. देवी भगवतीच्या आगमनानिमित्त दोन्ही गावांमध्ये भक्ती, आनंद आणि एकतेचा उत्सव अनुभवायला मिळाला.

दर तीन वर्षांनी पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी ही ‘देवाची पुनव’ म्हणजे आगरवाडा आणि पार्से गावांच्या ऐक्याचे प्रतीक मानली जाते. सोमवारी रात्री पार्से येथून देवी भगवतीच्या तरंगांची मिरवणूक निघाली. मंगळवारी पहाटे आगरवाडा सीमेवर देवी भगवतीचे आगमन झाल्यावर आगरवाडा ग्रामस्थांनी तिचे पारंपरिक विधींनी स्वागत केले.

आगरवाडा गावात प्रवेश केल्यानंतर देवीच्या तरंगांचे प्रत्येक देवस्थानात पारंपरिक स्वागत झाले. सातेरी मंदिरात देवी भगवतीचा कलश पूजनासाठी ठेवला व दिवसभर सुवासिनी व भक्तगणांनी दर्शन घेतले. सायंकाळी श्रीदेवी भगवतीच्या महाजनांना आणि मानकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने ‘कौल’ देण्यात आला.

त्यानंतर देवी भगवतीच्या तरंगांनी परतीचा प्रवास सुरू केला. बुधवारी पहाटे पार्से येथे देवीच्या प्रांगणात पोहोचल्यावर पारंपरिक विधी पार पाडून ‘देवाची पुनव’ उत्सवाची सांगता होईल.

पेडणे पुनवेतील ‘तुळाभार’ उत्साहात

देवस्थानचे पदाधिकारी जगन्नाथ देसाई यांनी सांगितले, की पेडण्याचा दसरोत्सव ज्या वर्षापासून सुरू झाला आहे त्याच वर्षापासून ‘तुळाभार’ हा नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरू असतो. अनेकजण देवाकडे मागणे करतात आणि नंतर तुळाभार अर्पण करतात.

आतापर्यंत ज्या व्यक्तीच्या नावे मागणे केले जाते, त्याच्या वजनाएवढी साखर आणि गूळ नवस फेडण्याच्या वेळी अर्पण केले जाते. ही परंपरा कित्येक वर्षापासून सुरू आहे. प्रत्येकजण भक्तिभावाने तुळाभार अर्पण करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT