Silver Sand Hotel Dainik Gomantak
गोवा

कोलवातील ‘सिल्‍वर सॅण्ड’ला पुन्‍हा दिले अभय

दुसऱ्यांदा कारवाई टळली: साबांखाचे कामगार घटनास्थळी फिरकलेच नाहीत

दैनिक गोमन्तक

मडगाव: सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून कोलवा येथे उभारलेले ‘सिल्वर सॅण्ड’ हॉटेल पाडण्यासाठी आज मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्‍यात आला होता. मात्र, हे बांधकाम पाडण्यासाठीची यंत्रसामग्री आणण्याकरिता पैशांची तरतूद न झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले पथक पाठविलेच नाही. त्यामुळे या हॉटेलला आणखी एकदा अभय मिळाले आहे.

या बांधकामाविरोधात कोलवा सिव्हिक फोरमचे ज्युडित आल्मेदा यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने हे बांधकाम पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज ही कारवाई होणार होती. कोलवाचे सचिव अमोल तिळवे यांच्या माहितीनुसार, सीआरझेड व वीज खाते यांची पथके या ठिकाणी आली, मात्र साबांखाने पथक पाठविलेच नाही.

10 लाखांचा खर्च

हे बांधकाम पाडण्यासाठी 10 लाख रुपये खर्च येणार आहे. तो मंजूर करावा, असा अर्ज साबांखाने उपजिल्हाधिकारी कार्यालयात केला होता. मात्र, तो मंजूर न झाल्यामुळे यंत्रसामग्री घटनास्थळी आणता आली नाही, असे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa To London Flight: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! गोवा ते लंडन विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा सुरु होणार; पर्यटनमंत्री खवंटेंची माहिती

Goa Real Estate: गुरुग्राम नको, आता 'गोवा'च! लक्झरी व्हिलांचा आसगाव बनतंय हॉटस्पॉट; गुंतवणूकदारांना मिळतोय बंपर फायदा

Goa Assembly Live: सरकार ऑक्टोबरपर्यंत क्रीडा देणी देणार: मुख्यमंत्री

Karnataka: कशासाठी? कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी! HIV पॉझिटीव्ह भावाचा बहीण आणि दाजीने केला खून

Damodar Saptah Fair: रंगांचा कल्लोळ! चालीरीतींची, संस्कृतीच्या उत्सवाची झळाळती झलक; वास्कोतील फेरी

SCROLL FOR NEXT