Viral Memes on Gobi Manchurian Ban in Goa Dainik Gomantak
गोवा

Memes on Gobi Manchurian Ban: वडापाववर बंदी घातली तर?, म्हापशात गोबी मंचुरियनच्या बंदीनंतर सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

Memes Gobi Manchurian Ban in Goa | देव बोडगेश्वर जत्रेत निर्माण झालेल्या स्वच्छतेच्या मुद्यावरुन मंचुरियनच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी नगरसेवक तारक आरोलकर यांनी केली होती.

Pramod Yadav

Viral Memes on Gobi Manchurian Ban:

म्हापसा पालिकेने गोबी मंचुरियनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. देव बोडगेश्वर जत्रेत निर्माण झालेल्या स्वच्छतेच्या मुद्यावरुन मंचुरियनच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी नगरसेवक तारक आरोलकर यांनी केली होती.

सर्वच नगरसेवकांनी या मागणीचे समर्थन करत अखेर पालिकेने बंदीची मागणी मान्य केली आहे. दरम्यान, यानंतर आता सोशल मिडियावर मजेशीर मीम्सचा पाऊस पडत आहे.

म्हापसा पालिकेच्या या निर्णयामुळे काही लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर, काही लोकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. सोशल मिडियावर याबाबत विविध मते व्यक्त केले जात आहेत.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका व्यक्तीने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर एका शाकाहारी व्यक्ती गोबी मंचुरियनचा शोध घेत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

काही लोकांनी पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

एक्सवरील एका युझरने पालिकेच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. 'आरोग्याच्या नावाखाली काहीजण विषारी इंजेक्शन घेतील पण चविष्ट, चमचमीत मंचुरियनचा आस्वाद घेऊ शकत नाहीत. जंक फूड खाणे बंद करण्यापेक्षा आम्ही गोव्यावर बहिष्कार टाकू,' असे एका युझरने लिहले आहे.

संजय हेगडे नावाच्या एका व्यक्तीने म्हपशात गोबी मंचुरियनच्या विक्रीवर बंदी घातली असून त्यांनी वडापाववर बंदी घातली तर काय होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गोबी मंचूरियनला लाल रंग यावा यासाठी सिंथेटिक रंगाचा वापर केला जातो. मात्र हा रंग आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळेच म्हापसा पालिकेने मंचुरियन विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मंचुरियन कुरकुरीत व्हावे यासाठी पीठात काही प्रकारची पावडर आणि कॉर्नस्टार्च वापरले जातात. तर, काही ठिकाणी कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी पावडर वापरली जाते असेही FDA च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISI च्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT