मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात घेतले अंबाबाईचे दर्शन Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खातेवाटपानंतर 'मंत्री' लागले कामाला

बाबूश वगळता सर्वांनी स्वीकारला कार्यभार: आढावा बैठका, खाते रोडमॅपला प्राधान्य

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची सर्वच कामे सुशेगाद चालली असली तरी उशिरा का असेना, मंत्रिमंडळ आता कामाला लागल्याचे दिसून येत आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात वगळता सर्वांनीच आपल्या मंत्रालयातील कार्यालयांचा ताबा घेतला असून विभागवार आढावा, बैठक, खात्याचा रोड मॅप, विविध सरकारी योजनांचे अवलोकन आणि पुनर्बांधणी आदी कामांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती मंत्र्यांशी बोलताना मिळत आहे. मंत्रिमंडळात अजून तीन मंत्रिपदे रिक्त असून ती लवकरच भरण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ही पदे कोणाला मिळणार? याबाबत मात्र स्पष्टता दिसून येत नाही.

निवडणुकीमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवलेल्या भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत 28 मार्च रोजी आठ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यात विश्‍वजीत राणे, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल, गोविंद गावडे आणि बाबूश मोन्सेरात या भाजप मंत्र्यांचा समावेश होता. ३ एप्रिल रोजी या मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. यातील महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात वगळता अन्य सात मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांचा ताबा घेऊन कामकाजाला सुरुवात केली आहे. ४ एप्रिल रोजी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, तसेच सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी आपल्या कार्यालयाचा ताबा घेतला तर ५ एप्रिल रोजी नीलेश काब्राल, ६ एप्रिल रोजी गोविंद गावडे, ७ एप्रिल रोजी रवी नाईक यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन कामाला सुरुवात केली, तर मंत्रिमंडळातील दोन नंबरचे नेते आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी नगर नियोजन, नगर विकास, वन खात्याच्या विभागवार बैठकांचा धडाका लावला आहे. उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनीही आपल्या विभागाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेत खात्यांचे सचिव, अधिकारी यांची आढावा बैठक संपवली आहे.

बाबूश कधी घेणार ताबा?

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे कामगार, कचरा व्यवस्थापन या खात्यांचीही जबाबदारी टाकण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मोन्सेरात यांनी कार्यालयात जाऊन पदाचा ताबा घेतलेला नाही. आठवड्याभरात ते ताबा घेतील, अशी माहिती मिळाली आहे.

सर्वाधिक चर्चा रिक्त मंत्रिपदाची

मंत्रिमंडळात अद्याप तीन मंत्रिपदे रिक्त असून राज्यात सर्वाधिक चर्चा या मंत्रिपदांवर कोण विराजमान होणार? याची आहे. ही पदे अपक्ष आणि मगोप यांच्यासाठी राखीव ठेवल्याची चर्चा असली तरी ही पदे भाजपच्या आमदारांनाच देण्यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय असल्याची माहिती आहे. या पदाबाबत गंभीर चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT