गोव्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवसायाशी अनेकदा संबंध प्रस्थापित झाला असला, तरी असे व्यवहार पूर्णत: उखडून काढण्यासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी विभागाबरोबर शेजारील राज्यांशी समन्वयाची आवश्यकता आहे. तरच असे व्यवहार करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचता येते. राज्यात ‘झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स’ या धोरणानुसार गोवा पोलिस अधिक सक्रिय होतील, असा आशावाद नवे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अशातच टोंक येथे एका घराच्या टेरेसवर चालणाऱ्या पोकर गेम्स जुगाराचा पणजी (Panaji) पोलिसांकडून पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी 25 जणांना अटक करून 883 पोकर चिप्स आणि रोखड व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे (action) पोलिसांचे सर्वत्र कोेतुक होत आहे.
तर दुसरीकडे हणजूण पोलिसांनी (Police) झरवाडा येथे हिगांता यासूजी (59) या जपानी नागरिकास अटक करून त्याच्याकडून 1 किलो चरस आणि गांजा मिळून 3.20 लाखांचा ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. झरवाडा येथे हा नागरिक संशयित रूपात आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली आणि तपासात त्याच्या बॅगमध्ये चरस आणि गांजा आढळून आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.