Rain Dainik Gomantak
गोवा

Heavy Rain In Goa : राज्यात अतिवृष्टीत 100 टक्के पेक्षा जास्त वाढ : डॉ. रमेश कुमार

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात मुसळधार पाऊस व अतिवृष्टीच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 117 वर्षांच्या आकडेवारीनुसार मुसळधार पावसामध्ये 60 टक्क्यांनी वाढ झाली असून अतिवृष्टीच्या घटनेमध्ये 100 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य जैवविविधता मंडळाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट झाली आहे.

याला मान्सून अभ्यासक आणि शास्त्रज्ञ डॉ. एम.आर. रमेश कुमार यांनी पुष्टी दिली असून मान्सून पॅटर्नमध्ये मोठा बदल होत असल्याचे सांगितले. बदलते हवामान आणि त्याचा राज्याच्या विविध घटकांवर होणारा परिणाम शोधण्यासाठी जैवविविधता मंडळाने हवामान बदलाचा 2023 ते २०३३ या दहा वर्षांचा कृतिशील आराखडा तयार केला असून तो सरकारला सादर केला आहे.

बिट्स पिलानी येथील प्रा. राजीव चतुर्वेदी यांनी भारतीय हवामान खात्याच्या माहितीच्या आधारे काही तथ्य सादर केले आहेत. त्यानुसार राज्यात हवामान बदलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. प्रामुख्याने पावसाचे प्रमाण, वेळ, स्थळ आणि काळ अशा अनेक बाबतीत मोठे बदल झाले आहेत.

राज्यात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वारंवारता दिसत असून ते राज्याच्या भौगोलिक आणि इतर बाबतीत धोकादायक आहे. मुसळधार पावसाच्या दिवसांमध्येही 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर जनजीवनावर परिणाम करणाऱ्या अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे एकूणच हवामान बदलाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

"अलीकडच्या काही वर्षांच्या उपलब्ध माहितीनुसार मान्सूनच्या अनेक बाबतीत बदल झालेले आहेत. हिंदी महासागर हा पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरापेक्षा उष्ण बनत आहे. यामुळे हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वादळे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात वादळाचे प्रमाण अरबी समुद्रात होणाऱ्या वादळांपेक्षा 70 टक्के जास्त आहे."

डॉ. रमेश कुमार, मान्सून अभ्यासक आणि शास्त्रज्ञ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT