Viral Video: अंधश्रद्धेचा आधार अन् फिल्मी ड्रामा; बेडवर सापाची कात सोडून गायब झालेल्या 'त्या' तरुणीचा इन्स्टावर खुलासा, म्हणाली, "नागीण बनली..."

Girl Marries Boyfriend Viral Video: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक अतिशय थक्क करणारी घटना समोर आली.
Girl Marries Boyfriend Viral Video
Girl Marries Boyfriend Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Girl Marries Boyfriend Viral Video: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक अतिशय थक्क करणारी घटना समोर आली. गेल्या काही दिवसांपासून एक तरुणी 'नागीण' बनून गायब झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, आता स्वतः त्या तरुणीनेच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन या सर्व फिल्मी ड्राम्याचा पर्दाफाश केला. अंधश्रद्धेचा आधार घेऊन घरच्यांची दिशाभूल करणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बेडवर सापाची कात अन् गावभर चर्चा

हे संपूर्ण प्रकरण औरैया जिल्ह्याच्या फफूंद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील आहे. रिना नावाची तरुणी अचानक घरातून गायब झाली होती. मात्र, तिने जाताना मागे सापाची कात आपल्या कपड्यांमध्ये गुंडाळून बेडवर ठेवली होती. सकाळी जेव्हा घरच्यांनी खोली पाहिली, तेव्हा त्यांना तिथे रिनाऐवजी सापाची कात दिसली. यानंतर संपूर्ण गावात "मुलगी (Girl) नागीण बनली" अशी अफवा पसरली आणि लोकांची झुंबड उडाली.

Girl Marries Boyfriend Viral Video
खासदारांनी एकमेकांचे कपडे फाडले अन् लाथाबुक्क्यांनी तुडवले, तुर्कीच्या संसदेत तूफान राडा; पण नक्की काय घडले? Video Viral

इन्स्टाग्रामवर सत्याचा उलगडा

रिना आधीपासूनच इन्स्टाग्रामवर नागिन गाण्यांवर डान्स करण्यासाठी प्रसिद्ध होती. मात्र, पोलीस तपास आणि मोबाईल सर्व्हिलन्स सुरु असतानाच तिने एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने स्पष्टपणे सांगितले की, "मी नागीण बनलेली नाही, तर माझ्या मर्जीने प्रियकरासोबत घर सोडून पळाले आहे." इतकेच नाही तर तिने एका युवकासोबत लग्न केल्याचा दावाही केला असून आपल्या सासरच्या मंडळींना त्रास देऊ नये, अशी विनंती पोलिसांना आणि घरच्यांना केली.

Girl Marries Boyfriend Viral Video
Viral Video: "ऐसी की तैसी कर दूंगी…"; ठाकूर असल्याचा माज दाखवत बँक कर्मचार्‍याची दादागिरी, गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल

फिल्मी स्टाईलने रचला बनाव

स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण पूर्णपणे पूर्वनियोजित होते. तरुणीने घरच्यांचे लक्ष भरकटवण्यासाठी सापाच्या कातीचा वापर केला होता, जेणेकरुन कोणीही तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे सत्य आता सर्वांसमोर आले असून या फिल्मी ड्राम्यावर आता पडदा पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com