Mormugao port Trust Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: खंडणीचा आरोप अत्यंत गंभीर; आमोणकर यांना अटक करा

Mormugao Port Trust: आमोणकरांच्या अटकेसाठी पालेकरांचा हल्लाबोल

गोमन्तक डिजिटल टीम

भाजपचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना तत्काळ अटक करण्याची मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे. आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून आमोणकरांवर निशाणा साधला. पालेकर यांनी म्हटले आहे की, आमोणकर हे एमपीटी येथे खंडणीला कथित खतपाणी घालत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फौजदारी कायद्यांच्या तरतुदीखाली गुन्हा नोंदवावा.

गोवा पोलिस या दखलपात्र गुन्ह्याची नोंद का घेत नाही? तसेच आमोणकरांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याद्वारे संरक्षण मिळत आहे. भाजपाला मुरगाव पत्तन प्राधिकरण उद्ध्वस्त करून बंदर खासगी कंपनीला विकण्यामध्ये रस आहे का? असे सवाल उपस्थित करून अमित पालेकर यांनी भाजपा सरकारला धारेवर धरले आहे.

संकल्प आमोणकर यांनी मुरगाव बंदरातील वाहतुकदारांना मालवाहतूक करण्यासाठी फक्त त्यांच्या मर्जीतील व्यक्तीच्या सेवेचा वापर करावा अशी कथित धमकी दिली आहे. ज्यामुळे अनेक कंपन्यांना त्यांचे कामकाज गोव्याबाहेर हलवण्याचा विचार चालविला आहे. आमोणकरांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे आदित्य बिर्ला समूहाने आपले बंदर महाराष्ट्रात हलवल्यानंतर, मुंबईस्थित कंपनीने आता मुरगाव बंदर प्राधिकरणाला (एमपीए) भाजप आमदारावर लगाम घालण्यासाठी पत्र लिहिले आहे, असेही पालेकर यांनी म्हटले आहे.

राजकीय हस्तक्षेपाला विरोध

सत्ताधारी पक्षाच्या आमोणकरांकडून राजकीय वर्चस्वाचा उघड गैरवापर होत असल्याने एमपीए ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कलंकित होण्याबरोबरच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिप्सम आयात करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीने एमपीटीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आम्ही मालवाहतूक सुरू करू शकलो नाही. कारण आमचे वाहतूकदार आणि लॉरीचालकांना मुरगावचे स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांच्याशी संबंधित गटाकडून धमकावले जात आहे.” याविषयीची बातमी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली असून अमित पालेकर यांनी या बातमीचे कात्रण दाखवत संकल्प आमोणकर यांच्या राजकीय हस्तक्षेपाला विरोध केला व त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT