Goa AAP: डेटा घेऊन या! ईडीने पालेकरांकडे मागितली माहिती, 'आप' नेत्यांची चौकशी सुरु

Delhi Excise Case Goa AAP Leader: कार्यालयात लंच ब्रेक झाल्याने चारहीजण बाहेर पडले असून, त्यांना पुन्हा दुपारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
Goa AAP Leader Before ED In Delhi Excise Case
Goa AAP Leader Before ED In Delhi Excise CaseDainik Gomantak

Goa AAP Leader Questioned By ED Over Delhi Excise Case

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांच्यासह रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक पणजीतील ईडी कार्यालयात दाखल झाले असून, त्यांची चौकशीची पहिली फेरी पार पडली आहे.

कार्यालयात लंच ब्रेक झाल्याने चारहीजण बाहेर पडले असून, त्यांना पुन्हा दुपारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

ईडीने बुधवारी (दि. 27) मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत समन्स बजावत, आज (गुरुवारी) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

ईडीच्या समन्सनुसार, अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि अशोक नाईक पणजीतील ईडी कार्यालयात दाखल झाले असून, त्यांची चौकशी झाली. ईडी समोर हजर झालेल्या चारही जणांना काही प्रश्न विचारल्यानंतर लंच ब्रेक असल्याने सर्वजण बाहेर पडले.

दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी अमित पालेकर यांच्याकडे काही माहिती मागितली असून, त्यांना दुपारी 2:15 वा माहितीसह हजर राहण्यास सांगितले आहे.

Goa AAP Leader Before ED In Delhi Excise Case
MGNREGA Wages Hikes: मनरेगा अंतर्गत वेतनात मोठी वाढ; गोव्यात मजुरी दरात सर्वाधिक वाढ, कोणत्या राज्यात किती वाढ?

ईडीने अमित पालेकर यांच्याकडे कोणती माहिती मागितली आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. तसेच, कार्यालयातून बाहेर पडलेल्या सर्वांना ईंडीने कोणते प्रश्न विचारले याबाबत देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, सर्वांना दुपारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले असल्याने सर्वांचे या चौकशीकडे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी नेत्यांच्या समर्थानात आमदार वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा आणि काँग्रेसचे सुनिल कंवठणकर नेत्यांच्या समर्थनात हजर होते. भाजपची दक्षिण आणि उत्तर गोव्यातील दोन्ही उमेदवारांचा पराभव होणार हे निश्चित असल्याने त्यांनी ईडीचे हत्यार उपसले आहे, असा आरोप कंवठणकर यांनी केला. निवडणूक सुरु असताना अशाप्रकारे समन्स पाठविण्याचा देखील त्यांनी निषेध केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com