Dovorlim Dicarpale Panchayat Dainik Gomantak
गोवा

'भाजपतर्फे हा एसटी समुदायावर केलेला थेट हल्ला'! सिद्धेश भगत यांचा दावा; दवर्ली - दिकरपाल सरपंच प्रकरणाचा तीव्र निषेध

dovorlim dicarpale panchayat: भगत पुढे म्हणाले की, पहिल्यांदा, भाजप सरकारने एसटी समुदायातील नेत्याला मंत्रिमंडळातून हटवले. आता त्यांनी एसटी सरपंचाला आपला निशाणा बनवले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: आम आदमी पक्षाने भाजपच्या दवर्ली - दिकरपाल पंचायत अस्थिर करण्याचा कारस्थानाचा तीव्र निषेध केला असून भाजपतर्फे हा एसटी समुदायावर केलेला थेट हल्ला असल्याचे सांगत भाजपच्या आदिवासी विरोधी मानसिकतेचा पुरावा असल्याचे सिद्धेश भगत म्हणाले.

आपचे राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष भगत पुढे म्हणाले की, भाजपची आदिवासी विरोधी मानसिकता जगजाहीर झाली आहे. दवर्ली - दिकरपाल पंचायतीमध्ये एसटी समुदायातील सरपंच निवडून आल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली. गुरूवारी सकाळी मिनिन कुलासो यांनी भाजपच्या उमेदवाराला ७- ४ च्या फरकाने पराभूत करून सरपंचपदाचा ताबा घेतला. मात्र विजयाच्या अवघ्या काही तासातच पंचायत सदस्यांनी एकत्र येऊन कुलासो यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वावर शंका घेत अविश्वास ठराव दाखल केला.

भगत पुढे म्हणाले की, पहिल्यांदा, भाजप सरकारने एसटी समुदायातील नेत्याला मंत्रिमंडळातून हटवले. आता त्यांनी एसटी सरपंचाला आपला निशाणा बनवले आहे. भाजप सरकारने आणि आमदारांनी ते एसटी समुदायाच्या विरोधात असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे. गोव्याची ओळख आणि लोकशाहीचा अविभाज्य भाग असलेल्या आदिवासी समुदायाबद्दल स्पष्ट दुजाभाव असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते.

आपचे एसटी नेते विनय वेळीप यांनी एसटी समुदायाला न्याय देण्यात अयशस्वी झाल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, एसटी समुदायाच्या हितार्थ भाजप सरकार सर्व बाजूने सपशेल अपयशी ठरले आहे. मग तो जमीन हक्कांचा मुद्दा असो, राजकीय आरक्षणाचा असो किंवा कल्याणकारी योजनांचा असो. त्यांचा खोटेपणा आता स्पष्ट झाला आहे. ते फक्त. आदिवासी कल्याणाच्या गोष्टी करतात, पण सत्यात ते आदिवासींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यांची ही कृत्ये केवळ राजकीय सूड नव्हे, तर सामाजिक अन्याय आहे.

आश्‍वासनाविरुद्ध कृती!

भगत म्हणाले, सरकार एसटी समुदायासाठी काम करत असल्याचा दावा करते, पण त्यांची कृती मात्र त्यांच्या आश्वासनांच्या विरुद्ध दिसून येते. आता सर्व गोमंतकीय खरे काय? ते स्पष्टपणे पाहू शकतात. एसटींसाठीची ग्वाही केवळ त्यांच्या भाषणांमध्येच असून प्रत्यक्षात तसे काहीही नसल्याचेच निष्पन्न झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'इंदूरमध्ये लज्जास्पद' घटना! ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची भर रस्त्यात छेडछाड; आरोपीला अटक

हरीण, स्लॉथ अस्वल! बोंडला अभयारण्यात 12 वर्षानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्रातून येणार नवे प्राणी

Ravi Naik: ‘अरे कोकणी गोव्याची राजभाषा आहे, कोकणीत बोल'! असा अधिकाऱ्यांना आग्रह करणारे, मराठी चळवळीतले 'रवी नाईक'

अग्रलेख: वीज दरवाढीचे ओझे केवळ सामान्य गोमंतकीयांवर पडणार नाही, याची दक्षता महत्त्वाची

Super Cup 2025: धेंपो क्लबची 'सुपर' मोहीम, ईस्ट बंगालविरुद्ध बांबोळीत लढत; फातोर्ड्यात बागान-चेन्नईयीन सामना

SCROLL FOR NEXT