Dovorlim Road: रस्ते दुरुस्त करा! दवर्लीत ‘आप’ची निदर्शने; आठवड्यात दुरुस्ती करण्याची मागणी

Aap Protest: एका आठवड्यात हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सिद्धेश भगत यांनी सांगितले, की दर वर्षी या रस्त्यांचे काम केले जाते आणि लगेच ते खराब होतात.
Bad Roads
Bad RoadsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: दवर्लीतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यांची डागडुजी केली होती; परंतु आता काही दिवसांतच हे रस्ते पुन्हा खड्डेमय झाल्याचे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सिद्धेश भगत यांनी सांगितले. ‘आप’चे कार्यकर्ते आणि स्थानिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निदर्शने केली.

एका आठवड्यात हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सिद्धेश भगत यांनी सांगितले, की दर वर्षी या रस्त्यांचे काम केले जाते आणि लगेच ते खराब होतात. हा रस्ता शाळा आणि चर्च यांच्यापासून केवळ १०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे रस्त्यावरील रहदारी किती असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

या खराब रस्त्यांमुळे वाहने खिळखिळी होतातच, शिवाय अनेक नागरिकांना पाठीच्या कण्याचा, मानेचा त्रास होत आहे. गर्भवती महिला, मुलेसुद्धा या रस्त्यावरून जातात, याचे भानसुद्धा संबंधित खात्याने ठेवावे, असे आवाहन भगत यांनी केले आहे.

Bad Roads
Dovorlim: सरपंचांना शिवीगाळ करत धमकी दिली, खुर्च्या तोडल्या; दवर्ली प्रकरणातील संशयिताची अटक टाळण्यासाठी धावाधाव

कामाच्या दर्जाची तपासणी व्हावी

खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने सांगितले, की कामगार रस्ते दुरुस्त करतात आणि निघून जातात; परंतु त्यांनी केलेल्या कामाची तपासणी होत नाही. रस्ता तयार केल्यावर तो किमान एक वर्ष तरी चांगला राहिला पाहिजे; परंतु तो दोनच महिन्यांत खराब होतो. या कामांवर सरकारी यंत्रणांनी नियंत्रण ठेवावे.

Bad Roads
Rumdamol Dovorlim: निवडणूक अधिकाऱ्याच्‍या छातीत कळ, रुमडामळची निवडणूक रद्द; रडीचा डाव असल्याचा सत्ताधारी गटाचा आरोप

खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव

मलनिस्सारण, वीज, जल आणि गॅसवाहिनीसाठी हे रस्ते खणले जातात. सरकारच्या विविध खात्यांमध्ये समन्वय नाही. किमान आता तरी हे रस्ते दुरुस्त करताना उच्च प्रतीचे साहित्य वापरावे, अशी मागणी भगत यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa election 2027 AAP Congress
Goa First Alliance Formation
Goa First Alliance 2027
Jerson Gomes Attack Latest News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com