Dovorlim: सरपंच निवडले, 4 तासांत अविश्वास ठराव; दवर्ली पंचायतीत सत्तानाट्य; विरोधकांचा भाजपला दणका

Dovorlim Dicarpale Panchayat: भाजपच्याच दोन सदस्यांना फोडून भाजपच्या हातात असलेली दवर्ली-दिकरपाल पंचायत हिसकावून घेण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला आहे.
Dovorlim Dicarpale Panchayat
Dovorlim Dicarpale PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: भाजपच्याच दोन सदस्यांना फोडून भाजपच्या हातात असलेली दवर्ली-दिकरपाल पंचायत हिसकावून घेण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला आहे. यामुळे या पंचायतीचे सरपंच म्हणून मिनीन कुलासो यांच्या विरोधात अवघ्या चार तासांच्या आत अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. मात्र, सत्ताधारी गटाने त्‍वरित हालचाली करत अवघ्‍या चार तासांत त्‍यांच्‍याविरोधात अविश्वास ठराव दाखल केल्‍याने या पंचायतीतील राजकीय हालचालींना पुन्‍हा एकदा वेग आला.

सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी मतदान ठेवले होते. यावेळी सरपंच निवडणुकीत भाजपला अपयशाला सामोरे जावे लागले. स्‍थानिक आमदार उल्‍हास तुयेकर यांनी पुरस्‍कृत केलेल्‍या विद्याधर आर्लेकर यांचा ७ विरुद्ध ४ मतांनी पराभव करून मिनीन कुलासो हे सरपंचपदी निवडून आले, तर उपसरपंच म्‍हणून भाजपचे समर्थन असलेल्‍या संपदा नाईक या बिनविरोध निवडून आल्‍या.

त्‍यानंतर सत्ताधारी गटाने त्‍वरित हालचाली करत विरोधी सदस्‍यांना आपल्‍या बाजूने ओढत कुलासो यांच्‍या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. कुलासो हे निवडून आले असले, तरी त्‍यांचे नेतृत्‍व बहुतेक पंच सदस्‍यांना मान्‍य नाही. त्‍यामुळे गोवा पंचायत कायद्याच्‍या कलम ५३(१) खाली हा अविश्वास ठराव दाखल करण्‍यात येत आहे, अशा आशयाची नोटीस सहा पंचांनी मडगावच्‍या गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.

या अविश्वास ठरावावर राजीनामा देऊन पायउतार झालेले माजी सरपंच साईश राजाध्‍यक्ष यांच्‍यासह सध्‍या निवडून आलेल्‍या उपसरपंच संपदा नाईक तसेच विद्याधर आर्लेकर, हरक्युलान नियासो, विधी वरक आणि संताेष नाईक यांनी सह्या केल्‍या आहेत. त्‍यामुळे ही पंचायत भाजपकडे रहाणार की विरोधकांकडे याचे उत्तर सध्‍या प्रलंबित अवस्‍थेत राहिले आहे.

यापूर्वी या पंचायतीवर भाजपचे साईश राजाध्‍यक्ष हे सरपंच होते. मात्र, त्‍यांनी आपला कार्यकाळ संपल्‍यानंतर राजीनामा दिला होता. त्‍यांच्‍यामागे आर्लेकर यांना सरपंच करण्‍याचे ठरले होते. आज सकाळी मतदान झाले, त्‍यावेळी ११ पंच सदस्‍यांपैकी केवळ चार पंचांनीच आर्लेकर यांना पाठिंबा दिला. कुलासो यांची सरपंच म्‍हणून निवडून आल्‍यानंतर काँग्रेसचे जिल्‍हा पंचायत सदस्‍य सिप्रू कार्दोज यांनी त्‍यांचे स्‍वागत केले.

Dovorlim Dicarpale Panchayat
Dovorlim Road: रस्ते दुरुस्त करा! दवर्लीत ‘आप’ची निदर्शने; आठवड्यात दुरुस्ती करण्याची मागणी

‘एसटी पंचांमुळे विजय सुकर’

सरपंचपदी कुलासो हे निवडून आल्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारांशी बोलताना, दवर्ली-दिकरपाल या पंचायतीत मोठ्या प्रमाणावर एसटी समाज आहे. मात्र, यापूर्वी आम्‍हाला ‘डिवाईड अँड रुल’ ही पद्धत वापरून फोडले होते, पण यावेळी सर्व एसटी पंच एकत्र आल्‍याने हा विजय सुकर झाला अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली. त्‍यानंतर पुन्‍हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्‍याने त्‍यांच्‍याविरोधात अविश्वास ठरावाला त्यांना तोंड द्यावे लागले आहे.

Dovorlim Dicarpale Panchayat
Dovorlim Road: रस्ते दुरुस्त करा! दवर्लीत ‘आप’ची निदर्शने; आठवड्यात दुरुस्ती करण्याची मागणी

एसटींना दाबून ठेवण्याचा रडीचा डाव

सकाळी ज्याची सरपंच म्हणून निवड होते त्या मिनीन कुलासो हे सरपंचपद सांभाळण्यास पात्र नाहीत असे म्हणत दुपारपर्यंत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करणे हा लोकशाहीशी भाजपने केलेला खेळ असून एका एसटी समाजाच्या सदस्याला सरपंच पदापासून दूर ठेवण्यासाठी खेळली गेलेली घाणेरडी खेळी असा आरोप आपचे सिद्धेश भगत यांनी केला आहे. कुलासो याना काम करण्यास वेळही न देता ते सरपंचपद सांभाळण्यास असमर्थ अशा निष्कर्षापर्यंत कुणी कसा येऊ शकतो असा सवाल त्यांनी केला. सावियो कुतिन्हो यांनीही या घटनेचा निषेध करताना जी व्यक्ती सधनशीरपणे निवडून आली तिला संधी न घेता आपल्याला हवी असलेली व्यक्ती त्या पदावर आणण्यासाठी भाजपने हा वाकडा रस्ता स्वीकारला आहे. यापूर्वी भाजपने जे मडगाव पालिकेत केले होते तेच आता दवर्लीत केले जात आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com