Super Cup 2025: धेंपो क्लबची 'सुपर' मोहीम, ईस्ट बंगालविरुद्ध बांबोळीत लढत; फातोर्ड्यात बागान-चेन्नईयीन सामना

Super Cup Dempo Club Match: स्पर्धेतील सामन्यांत बांबोळी येथे पश्‍चिम स्टँडमध्ये, तर फातोर्डा येथे पूर्व स्टँडमध्ये फुटबॉलप्रेमींना मोफत प्रवेश असेल. प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
Sports News
Goa FootballDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) सुपर कप फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून (ता.२५) सुरवात होत असून बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर धेंपो स्पोर्ट्‌स क्लब व ईस्ट बंगाल यांच्यात, तर फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसी यांच्यात अ गट लढती होतील.

स्पर्धेत १६ संघांचा समावेश असून चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेतील सामन्यांत बांबोळी येथे पश्‍चिम स्टँडमध्ये, तर फातोर्डा येथे पूर्व स्टँडमध्ये फुटबॉलप्रेमींना मोफत प्रवेश असेल. प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

रियल काश्‍मीर एफसीने परदेशी खेळाडूंचा व्हिसा न झाल्याचे कारण देत ऐनवेळी माघार घेतल्यानंतर गतवेळच्या आय-लीग स्पर्धेत सहावा क्रमांक मिळालेल्या धेंपो क्लबला स्पर्धेत प्रवेश मिळाला.

त्यांच्यासाठी पहिल्याच लढतीत खडतर आव्हान असेल. ऑस्कर ब्रुझाँ यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालने यंदा ड्युरँड कपची उपांत्य फेरी, तर आयएफए शिल्डची अंतिम फेरी गाठली आहे. कमी वेळेत स्पर्धेसाठी तयारी करावी लागली असली, तरी धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर नाईक आशावादी आहेत.

Sports News
New Coach of Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाला 13 वर्षांनंतर मिळाला 'Indian Coach', 'या' माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

त्यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले, की ‘कमी कालावधीत संघबांधणी आव्हानात्मकच आहे, तरीही खेळाडूंनी सरावात चांगली प्रगती प्रदर्शित केली. आम्ही काही विशिष्ट बाबींवर मेहनत घेतली आहे. एकंदरीत आम्ही स्पर्धेसाठी सज्ज आहोत.’ धेंपो क्लब या स्पर्धेत परदेशी खेळाडूंविना खेळत आहे.

Sports News
I League Football: धेंपो क्लबच्या ‘सुपर सब’ची कमाल! दिल्ली एफसीविरोधात नोंदवला शानदार विजय; नेस्टरचा गोल ठरला निर्णायक

आयएफए शिल्ड जिंकून नव्या आत्मविश्वासासह कोलकात्यातील मोहन बागान संघ गोव्यात दाखल झाला आहे. होजे मोलिना यांच्या मार्गदर्शनाखालील हा बलाढ्य संघ विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे. गोमंतकीय क्लिफर्ड मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसी संघात सर्व भारतीय फुटबॉलपटू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com