AAP Candidate list Dainik Gomantak
गोवा

AAP Candidate: आपची आणखी एक तीन उमेदवारांची यादी जाहीर

गोव्यात एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत

दैनिक गोमन्तक

AAP Candidate : येत्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. प्रत्येक पक्षातर्फे हळूहळू उमेदवारांची नावे गुलदस्त्यातून समोर येत आहेत. याआधी आप (AAP) पक्षाने उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या होत्या. आज आप पक्षातर्फे उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 3 उमेदवारांचा समावेश आहे. वास्कोतून अॅड. सुनील लोरन, मांद्रेतून अॅड. प्रसाद शहापूरकर, तर पर्वरीतून रितेश चोडणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (AAP announces list of candidates)

दरम्यान, 7 जानेवारी रोजी, AAP ने गोवा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात भाजपचे माजी मंत्री महादेव नाईक, अलिना सलदान्हा आणि अमित पालेकर यांच्या नावांचा समावेश होता. त्याच वेळी, 9 जानेवारी रोजी 'आप'ने गोवा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. यानंतर 'आप'ने 12 जानेवारीला पाच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यानंतर 18 जानेवारीला आम आदमी पक्षाने पाच उमेदवारांसह चौथी यादी जाहीर केली. गोव्यात एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT