निवडणूक आयोगाने पुन्हा वाढवली उमेदवारांची चिंता

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने घेतला 'हा' निर्णय
Election Commission
Election CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत (Assembly Election) निवडणूक (Election) आयोगाने रॅली आणि रोड शोला पुन्हा ब्रेक लावला आहे. कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर 10 जणांना घरोघरी प्रचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. याआधी घरोघरी प्रचार करण्यासाठी फक्त 5 जणांना परवानगी होते.

Election Commission
Goa Corona Update: आज नव्या 2691 कोरोनाबाधितांची नोंद; 8 जणांचा मृत्यू

तसे, या निर्बंधांच्या दरम्यान, यावेळी पक्षांना काही शिथिलता देखील देण्यात आली आहे. घरोघरी प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दुप्पट करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याशिवाय 1 फेब्रुवारीपासून मतदान क्षेत्रात छोट्या सार्वजनिक सभा घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ व्हॅनद्वारे डिजिटल प्रचारासाठी, व्हॅन केवळ नियुक्त खुल्या ठिकाणीच उभी करण्याची परवानगी दिली जाणार आहे. अशा परिस्थितीत काही दिलासा आणि काही निर्बंध कायम राहणार आहेत.

आता उमेदवारांना मोकळ्या जागेत जाहीर सभा घेता येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. परंतु ती सभा 500 लोकांपेक्षा कमी किंवा कोणत्याही ठिकाणच्या 50 टक्के क्षमतेने होईल. अशा परिस्थितीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असेल आणि सर्व कोरोना प्रोटोकॉल देखील पाळावे लागतील. आता 28 जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना काही निर्बंधांसह प्रचार करता येणार आहे, तर 1 फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांनाही प्रचार सुरू करता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com