Utpal Parrikar  Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: भाजपने 'त्यांना' नाकारले मात्र आप आणि शिवसेनेने स्वीकारले

उत्पल पर्रीकर यांना भाजपने नाकारले यातच आप आणि शिवसेनेने दिलेली ऑफर ही राज्याच्या राजकारणाची चौकट बदलू शकते.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यातच भाजपची उमेदवारी हा चर्चेचा विषय ठरत आहे. माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर ही उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र भाजपने त्यांना नाकारले दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी गोव्याची राजधानी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. एवढेच नाही तर भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात, असंही त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

उत्पल पर्रीकर यांना भाजपने नाकारले यातच आप आणि शिवसेनेने दिलेली ऑफर ही राज्याच्या राजकारणाची चौकट बदलू शकते. यावर उत्पल पर्रीकरानी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. (AAP and Shiv Sena offer to Utpal Parrikar)

प्रमोद सावंत यांची भूमिका

उत्पल पर्रीकर यांच्या नाराजी नाट्यांवर बोलण्याचे सावंत यांनी टाळले. उत्पल पर्रीकर यांना भाजप उमेदवारी देणार का, असे विचारले असता त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पुढे केले. ते म्हणाले, पक्षाचे वरिष्ठ नेते उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर निर्णय घेतील.

देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे फक्त पुत्र म्हणून उत्पल पर्रीकर यांना तिकीट देता येणार नाही. पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट मिळणार नाही, पर्रीकरांनी पक्ष वाढीसाठी आणि गोव्यासाठी भरीव योगदान दिले आहे. मात्र पर्रीकरांचा मुलगा उत्पल परिकर यांना तिकीट उमेदवारी मिळणार नाही त्यासाठी त्यांचं कार्य कर्तुत्व लक्षात घेतल जात.

शिवसेनेचा पाठिंबा

उत्पल यांनी विधानसभा निवडणुकीत (Goa Legislative Assembly Election 2022) राजकीय पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या उमेदवारीला शिवसेना पाठिंबा देण्यास तयार आहे.

पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. हिंमत दाखवायला हवी, चार भिंतीत बसून लढाई होत नाही. लढायच असेल तर समोर या आम्ही त्यांच्यासोबत आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ते जर बाहेर पडले आणि पणजीतुन निवडणुकीला उभे राहिले तर गोव्यातील जनता त्यांच्या मागे उभी राहिल.

शिवसेना (Shiv Sena) त्यांना सर्वोतोपरी मदत करेल, ते सांगितील ती मदत शिवसेना करेल. आमच्यासोबत इतरही अनेक जण मदत करतील. मनोहर पर्रिकर मोठे नेते, राजकारणापलिकडील नेते होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणावर अन्याय होत असेल, ते धाडसाने पुढे येवून काही करणार असतील तर शिवसेना आणि इतर समाजही त्यांना मदत करेल. पुर्णपणे पाठिंबा देत संजय राऊतांनी (Sanjay Raut) उत्पल पर्रिकरांना निवडनुकीसाठी हात पुढे केला आहे.

'आप' कडून पाठिंबा

पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना सध्या उत्पल पर्रीकरांबद्दल चाललेल्या चर्चांबद्दल विचारले असता, केजरीवाल म्हणाले की, 'मी स्व. मनोहर पर्रीकर यांचा मनापासून अंदर करतो. सध्या त्यांच्या मुलाबद्दल चाललेल्या चर्चा मला माहीत आहेत. त्यांना जर निवडणूक लढवायची असेल आणि त्यांना जर आम आदमी पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.' अरविंद केजरीवाल यांच्या या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चासत्रे रंगू लागली आहेत. त्यांनी एका अर्थाने उत्पल पर्रीकर यांना पक्षात खुले आवाहन दिले आहे. स्वत:च्या पक्षाने डावलल्यामुळे ते आता 'आप'च्या या आवाहनाचा स्वीकार करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

उत्पल पर्रीकर यांची भूमिका

भाजपवर टीका करत "सध्याचे राजकारण मला मान्य नाही; जिंकण्याची क्षमता, सचोटी, चारित्र्य याचा राजकारणात काही फरक पडत नाही का? मनोहर पर्रीकर यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघातून तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याची परवानगी देत ​​आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यात बदल व्हायला हवा आणि म्हणून मी प्रयत्न करत आहे; वडिलांसोबत काम करणारे सर्व ज्येष्ठ नेते आज माझ्यासोबत काम करत आहेत. मी जनतेत जाहीरपणे जात असून, येथे पक्ष स्थापन करणारे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT