मोरजी: मांद्रे मतदार संघात 2017 नंतरच्या विधानसभा निवडणुकी नंतर आमदार दयानंद सोपटे हे भाजपात गेल्यानंतर काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्याकाळात युवा सामाजिक कार्यकरत्ये सचिन परब यांनी काँग्रेस (Congress) पक्ष जिवंत ठेवला, पदर मोड करून मतदार संघात विविध उपक्रम राबविले , निस्वार्थी भावनेने त्यांनी काम केले आता काँग्रेस पक्षाने सचिन परब यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकरत्ये करत आहेत. (Sachin Parab Mandrem Latest News)
काँग्रेस पक्षाचे मांद्रेत सचिन परब यांनी अस्तित्व कायम ठेवले आहे. आता पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन त्यांना सन्मानित करावे अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे, वेळप्रसंगी जर काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही तरीही त्यांनी निवडणूक (Election) लढवावी असा दबाव त्यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्ये आणत आहे.
अनेक कार्यकर्त्ये पक्ष सोडण्याच्या मार्गावर
मांद्रे मतदार संघाची कॉंग्रेस उमेदवारी कुणाला मिळणार कि ती गोवा फॉरवर्डला जाणार , याविषयी काहीच भूमिका नसल्याने अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्ये नाराज आहेत. जर सचिन परब याना उमेदवारी मिळाली नाही तर अनेक शेकडो युवा कॉंग्रेस कार्यकर्त्ये समर्थक पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत.
या विषयी कॉंग्रेस नेते सचिन परब यांच्याकडे संपर्क साधला असता आपल्याला आपल्या कार्याची दखल घेवून कॉंग्रेस पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आपण आजपर्यंत प्रामाणिक काम केले. त्या कामाची दाखल पक्षश्रेस्ठी घेणार आहे. असे सांगून, आपले समर्थक आपल्यावर दबाव आणत आहे, उमेदवारी जर आपल्याला मिळाली नाही तर अनेकजण कॉंग्रेस पक्ष सोडून जाणार आहे असे सचिन म्हणाले.
अन्यथा निवडणूक लढवणार ?
मांद्रे मतदार संघात आपण मागची 15 वर्षे अविरत कार्य करत आहे. त्यामुळे मतदार संघातील अनेक युवा कार्यकर्त्याची आपल्याकडे नाळ जोडली गेली. आता कॉंग्रेसची उमेदवारी आपल्याला मिळण्यासाठी प्रतीक्षा आहे. उमेदवारी मिळाली नाही तर कार्यकर्त्य आपल्यावर दबाव आणून निवडणुकीत उतरा असा हट्ट धरत असल्याने आपल्या नावाचा विचार जर कॉंग्रेसने केला नाही तर आपण कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून त्यांच्यानुसार निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
मतदार संघातील कॉंग्रेस तर्फे सामाजिक बांधिलकी ओळखून युवा नेते सचिन परब ,मतदार संघात विविध योजना राबवीत असतात .आता पर्यंत आरोग्य शिबिरे , बेरोजगार युवक मेळावे , सांस्कृतिक कार्यक्रम त्या पलीकडे जावून गरीब विध्यार्थ्याना मदत करणे , लोंकडाऊन काळात सचिन परब यांनी केरी , पालये , हरमल , मांद्रे , मोरजी , आगरवाडा , पार्से , तुये विर्नोडा या नऊही पंचायत क्षेत्रात 5000 हजारापेक्षा जास्त मास्क , सेनीटायीझर , मोफत भात खत , शिवाय कडधान्य भाजीपाला वितरीत केला , अडलेल्याना मदतीचा हात देण्यास ते पुढाकार घेत असतात .
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.