Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

AAP Maharashtra: केजरीवालांचेही 'मिशन महाराष्ट्र'; गोवा प्रमुखांचा नारायण राणेंवर प्रहार

Maharashtra Assembly Election 2024: आघाडीने परवानगी दिल्यास जिंकण्याची शक्यता असणाऱ्या काही जागांवर उमेदवार देण्याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती पालेकरांनी दिली.

Pramod Yadav

Maharashtra Assembly Election 2024

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील पक्षफुटी नतंर होणारी ही निवडणूक अनेकार्थाने महत्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढाई यावेळी पाहायला मिळेल.

इंडिया आघाडीचा भाग असणारी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष देखील महाराष्ट्राची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी कोकणात याबाबत भाष्य केले आहे.

कुडाळ, सिंधुदुर्ग येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना अमित पालेकर यांनी कोकणात पक्ष मजबूत करण्याबाबत भाष्य केले. आम आदमी पक्ष विशेषत: कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच कोल्हापुरात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीसोबत आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे. पण, आघाडीने परवानगी दिल्यास जिंकण्याची शक्यता असणाऱ्या काही जागांवर उमेदवार देण्याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती पालेकरांनी दिली.

कोकणात आम आदमी पक्ष वाढल्याचा दावा यावेळी पालेकरांनी केला. तसेच, कोकणतील स्थानिकांनी नारायण राणे यांच्या सूडाच्या राजकारणाची वीट आला असून, ते भाजपला पर्याय शोधत आहेत, असेही पालेकर म्हणाले.

इंडिया आघाडीचा भाग म्हणून शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला आम आदमी पक्षाचा पाठिंबा असल्याचे पालेकर म्हणाले.

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर येथील आपच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवार देण्यासाठी दबाव आहे, असे अमित पालेकर म्हणाले. पालेकर आम आदमी पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी आहेत. कुडाळ येथे आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले असता त्यांनी निवडुकीबाबत भाष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT