Tiger Was Spotted Near Kulem Village Railway Station  Dainik Gomantak
गोवा

Mollem Forest of Goa: करंझोळ रेल्वे स्टेशनवर पट्टेरी वाघाचे दर्शन

करंझोळ रेल्वे स्टेशनवर पट्टेरी वाघाचे बछडे दिसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

दैनिक गोमन्तक

Kulem Villege: कुळे येथील करंझोळ रेल्वे स्टेशनवर पट्टेरी वाघाचे बछडे दिसल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. हा परिसर मोले अभयारण्याच्या अख्यातारीत येत आहे. अशा पट्टेरी वाघाचे येथे वारंवार दर्शन होत आहे.

सोनावळीनंतर दुधसागर धबधबा आणि त्यानंतर करंजोळ स्टेशन लागते. या ठिकाणी असलेले स्टेशन जरी मोठे नसले तरी रेल्वे कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे. आज सायंकाळी 6.55च्या दरम्यान पट्टेरी वाघाचे बछडे रेल्वे स्टेशन समोरील ट्रॅकच्या बाजूने चालताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आढळले.

त्यांनी त्याचे मोबाईलवर चित्रण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, मोले अभयारण्यातील वन खात्याचे अधिकारी सिद्धेश नाईक यांनी व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यात येईल, असे सांगितले. यापूर्वी सोनावळी कुळे येथील अभयारण्यातील जंगलात सुद्धा अनेकदा अशा पट्टेरी वाघ पाहिल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT