Goa News: गोव्यात लवकरच ‘एमएसएमई’ सेंटर- केंद्रीय मंत्री नारायण राणे

प्रत्येकाने उद्योगाचा विचार केल्यास देशाची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
Narayan Rane
Narayan Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: देशाच्या एकूण उत्पादकतेमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) 50 टक्के वाटा आहे. तो वाढला पाहिजे, यासाठी गोव्यात एमएसएमई सेंटर उभा केले जाईल. प्रत्येकाने उद्योगाचा विचार केल्यास देशाची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

राज्यातील उद्योजकांना मार्गदर्शन करण्याकरिता सरकारच्या व्यापार, उद्योग आणि वाणिज्य विभाग व लघु उद्योग भारतीने दरबार हॉलमध्ये एक दिवसाचे अधिवेशन आयोजित केले होते.  यावेळी ते बोलत होते. 

अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तर लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक विजय दुबे, बीएसई इंडियाचे स्टार्टअप्स आणि एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर उपस्थित होते. यावेळी शेखर सरदेसाई, पल्लवी साळगावकर आणि दामोदर कोचकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

‘व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलन’ ते ‘ब्रँड आधारित विकास ’ पर्यंत अनेक विषयांवरील अनेक सत्रांमध्ये उद्योजकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात लघु उद्योग भारतीच्या गोवा विभागाने निर्यात वाढवण्यावर आणि राज्यात रोजगार निर्माण करणारे आणि उद्योजकतेला चालना देणारे औद्योगिक समूह  तयार करण्यावर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला.

राज्यातील सुमारे 96 टक्के उद्योग हे सूक्ष्म श्रेणीतील आहेत. या क्षेत्रामध्ये विकासाची  प्रचंड क्षमता आहे,  असे राणे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांचेही भाषण झाले.

Narayan Rane
Covid-19 and Brain Stroke : ‘पोस्‍ट कोविड’चे घातक परिणाम; हृदयविकार, ब्रेनस्‍ट्रोकमध्‍ये वाढ

भारतीय अर्थव्यवस्थेत गतिमानता आणण्यासाठी  निःस्वार्थ प्रयत्नांबद्दल केंद्रीय मंत्री राणे यांनी लघु उद्योग भारतीचे आभार मानले. स्थायी उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने  राज्यासाठी कायमस्वरूपी उद्योगांची नितांत गरज आहे. राज्यात औद्योगिक उपक्रमांची भरभराट सुनिश्चित करण्यासाठी गोवा राज्याने ठोस योजना तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com