Indore Salesman replace gold with bentex Dainik Gomantak
गोवा

सराफ दुकानातील सेल्समनने 'त्या' पैशातून केली गोवा, मुंबईची सैर; सोने चोरुन त्याजागी ठेवायचा बेंटेक्सचे दागिने!

चोरीचे सोने गोव्यासह मुंबईत विकले

Akshay Nirmale

सराफ दुकानात सेल्समन म्हणून काम करणाऱ्या एकाने त्याच दुकानात चोरी करून परराज्यात हे सोने विकल्याची घटना समोर आली आहे. चोरलेल्या दागिन्यांप्रमाणेच हुबेहुब खोटे दागिने बनवून घेऊन तो शोरूममध्ये ठेवायचा. खरे सोन्याचे दागिने त्याने गोवा आणि मुंबईत विकले असून त्या पैशातून त्याने गोवा आणि मुंबईची सैर देखील केली आहे.

आशिष मनोहरसिंग जाधव असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, जेव्हा त्याच्याकडील पैसे संपले तेव्हा त्याला कुटुंबाची आठवण झाली आणि तो इंदुरला परतला आणि घरी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.

(Indore Salesman replace gold with bentex)

इंदुरमधील विजय नगर पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, आशिष मनोहरसिंग जाधव हा एबी रोडवरील बिझनेस प्रिन्सेस पार्कच्या ज्वेलरी शोरूममध्ये ६-७ महिन्यांपूर्वी सेल्समन म्हणून रुजू झाला होता. येथे त्याला 32 हजार रुपये पगार होता.

आशिषने शोकेसमधून मूळ दागिने चोरून त्याऐवजी बनावट दागिने ठेवले. त्याने सोन्याचे एकूण 7 दागिने चोरले. तथापि, दागिन्यांची विक्री करताना इतर सेल्समनना संशय आल्याने याबाबत चौकशी करण्यात आली.

तपासात दागिने बनावट असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सर्व काही स्पष्ट झाले. हे सर्व आशिषने केल्याचे समोर आले.

ज्वेलरी शोरूम व्यवस्थापनाने आरोपी आशिषविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, परंतु याबाबत सुगावा लागताच आशिष फरार झाला. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

दरम्यान, आशिषने चोरीचे दागिने गोवा, मुंबई आणि मुरादाबाद येथे विकले. आणि त्याच पैशात तो हॉटेलमध्ये राहू लागला. गोवा-मुंबईत काही काळ राहून तो नुकताच इंदूर येथील घरी परतला, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले.

ज्वेलरी शोरूमच्या व्यवस्थापकाने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. आशिष जाधव याने दीड महिन्यात 7 सोन्याच्या वस्तू चोरल्या होत्या.

सोन्याचे दागिने चोरून त्याजागी बेंटेक्सचे दागिने तो ठेवायचा.

शोरूम मॅनेजरला सोने विकताना ते बनावट असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी जुने फुटेज पाहिले. त्यात सेल्समन आशिष चोरी करत असल्याचे दिसून आले.

दरम्यान, त्याच्याकडून चोरीच्या 7 सोन्याच्या दागिन्यांपैकी 3 मिळाल्या आहेत. एकूण चार दागिने त्याने महाराष्ट्र आणि गोव्यात विकल्या होत्या. पोलिस ते दागिनेही ताब्यात घेणार आहेत.

आरोपी आशिष हा शोरूममधील मूळ दागिन्यांचे फोटो काढून हुबेहूब इमिटेशन ज्वेलरी बनवून घ्यायचा. त्यानंतर खरे दागिने चोरून त्या ठिकाणी बेंटेक्सचे दागिने ठेवायचा. आशिष हा इंदूरच्या बंगाली भागात आई-वडील आणि पत्नी-मुलासह राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT