Goa Sports Dainik Gomantak
गोवा

Goa Sports: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ तंबू गेम: वाल्मिकी

Goa Sports: राज्यात भाजप सरकार दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्याऐवजी क्रीडा क्षेत्रात पक्षपात आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यात दंग आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केला.

दैनिक गोमन्तक

Goa Sports: राज्यात भाजप सरकार दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करण्याऐवजी क्रीडा क्षेत्रात पक्षपात आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यात दंग आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केला.

पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई, सुनील सिगणापूरकर उपस्थित होते.

नाईक म्हणाले, राज्यातील खेळाडूंमध्ये क्षमता असताना भाजप सरकार आवश्यक ते सहकार्य करण्यात अपयशी ठरले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

मात्र, यातून खेळाची एकसुद्धा पायाभूत सुविधा उभारता आली नाही. सरकारने एका खासगी संस्थेला निविदा जारी केल्यामुळे निकृष्ट दर्जाचे केटरिंग, वाहतूक आणि निवास यांचा सामना खेळाडूंना करावा लागला. योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे अनेकांना स्वतःची व्यवस्था स्वतः करावी लागली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा जबाबदारी घेण्याची इच्छाशक्तीचा अभाव होता. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या 10 कोटी दंडाच्या चेतावणीला प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी शेवटच्या क्षणी व्यवस्था करण्यात आली.

इतकेच नाही, तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन समारंभात भाजप सरकारमधील प्रमुख नेत्यांना बाजूला सारण्यात आले होते. यावरून भाजप आपल्याच पक्षातील प्रभावशाली बहुजन व्यक्तींसोबत कसे वागतात हे लोकांना कळून चुकले आहे, असेही वाल्मिकी नाईक म्हणाले.

‘ऑडिट अहवाल उपलब्ध करा’

आपचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा ऑडिट अहवाल करून, तो जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

भारताचे माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनकड प्रमुख पाहुणे असतानाही प्रेक्षकांची संख्या खूपच कमी होती. राष्ट्रीय खेळांच्या समारोप समारंभासाठी प्रेक्षक व्यवस्था करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका तेलेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT