Pollution Control Board: कुंकळ्‍ळीतील ‘तो’ फिश मिल कारखाना बंद करा

Pollution Control Board: प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश : पाणीसाठे दूषित
Goa GIDC
Goa GIDCDainik Gomantak
Published on
Updated on

Pollution Control Board: आपले सांडपाणी थेट नाल्‍यात सोडून कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत क्षेत्रात प्रदूषण करण्‍याचा आरोप असलेला एक फिश मिल प्रकल्‍प बंद करण्‍याचा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

Goa GIDC
Illegal Sand Mining: बेकायदेशीर बांधकामासाठी वाळूच्‍या टेकड्यांचा विद्‌ध्‍वंस

सोमवारी (ता.१३) आणखी एका प्रकल्‍पावर अशाचप्रकारची कारवाई होण्‍याचे संकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्‍यक्ष महेश पाटील यांनी दिले आहेत.

मंडळाने दोन दिवसांपूर्वीच हा आदेश जारी केला. यासंंबंधी यापूर्वी एक बैठक घेण्‍यात आली होती, त्‍यावेळी कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्‍यक्ष अभय केणी हेही उपस्‍थित होते.

Goa GIDC
Mahadayi River: ‘म्हादई प्रवाह’चे कार्यालय लवकरच गोव्यात

या वसाहतीतील हे कारखाने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करत असून त्‍यामुळे या भागातील पाण्‍याचे साठे दूषित झाले असून त्‍यांना दुर्गंधी येत असल्‍याचा दावा करून 15 दिवसांपूर्वी कुंकळ्‍ळीचे नागरिक रस्‍त्‍यावर आले होते, असे पाटील यांनी सांगितले.

या भागातील फिश मिल कारखान्‍याच्‍या मालकांसोबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठक घेऊन त्‍यांना काही सूचना केल्‍या होत्‍या. बऱ्याच उद्योगांनी या सूचनांचे पालन केले असले तरी काही उद्योगांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा उद्योगांवर कडक कारवाई केली जाईल.

- महेश पाटील, अध्‍यक्ष, प्रदूषण नियंत्रण मंडळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com