37th National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Game 2023: जिद्दी आकांक्षाचे पुरस्कर्त्यांविना ‘मिशन ऑलिंपिक’

National Game 2023: गोव्याची सुवर्णविजेती : 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकही गेम न गमावता बाजी

दैनिक गोमन्तक

किशोर पेटकर

National Game 2023: आकांक्षा साळुंखे हिच्यासाठी गोवा खास आहे. हवाई दलातील सेवानिवृत्त कमांडर हेमंत साळुंखे यांच्या जिगरबाज मुलीने राज्यातूनच स्क्वॉश खेळात भरारी घेतली. रविवारी चिखली-वास्को येथील स्क्वॉश कोर्टवर तिला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने पाठीराखे उपस्थित होते

त्यांना निराश न करता तिने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला गटातील सुवर्णपदकाला एकही गेम न गमावता गवसणी घातली आणि पुरस्कर्त्यांविना असलेल्या या व्यावसायिक खेळाडूने ‘मिशन लॉस एंजलिस ऑलिंपिक’ची वाटचाल निश्चित केली.

वास्कोत शालेय शिक्षण घेतल्यानंतर आकांक्षा सहा वर्षांपूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली, त्याचवेळी स्क्वॉशमध्ये पारंगत होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले होते. गतवर्षी तिचे शिक्षण पूर्ण झाले, त्यानंतर खेळाडू या नात्याने तिने अमेरिकेचा पाच वर्षांचा व्हिसा मिळविला. ती सध्या न्यूयॉर्कस्थित असून तेथेच सराव-प्रशिक्षण घेते.

2028 मध्ये लॉस एंजलिस येथे होणाऱ्या स्क्वॉश खेळाचा समावेश झाला आहे. त्यामुळे आकांक्षाची उमेद वाढली आहे. आर्थिक चणचण असली, तरी तिने भारताकडून ऑलिंपिक खेळण्याचे स्वप्न कायम राखले आहे. त्याकामी तिला वडिलांची मोलाची साथ लाभत आहे.

‘‘गतवर्षी तिला अमेरिकेचा पाच वर्षांसाठी खेळाडू या नात्याने पी-1 व्हिसा मिळाला. लॉस एंजलिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी तोपर्यंत न्यूयॉर्कमध्ये मुक्काम करणे आकांक्षाला शक्य होईल.’’ असे हेमंत साळुंखे यांनी सांगितले.

आकांक्षाला पुरस्कर्ता नाही, पण आम्हीच तिचा व्यावसायिक स्क्वॉशमधील खर्च भागवत आहोत. ती मेहनती आहे आणि लॉस एंजलिस ऑलिंपिकमध्ये तिची देशाचे प्रतिनिधित्व करण्याची प्रबळ इच्छा आहे. न्यूयॉर्कमधील प्रशिक्षण, निवास, स्पर्धांनिमित्त प्रवास यासाठी प्रतिवर्षी ३० ते ३५ लाख रुपये खर्च होतात.
- कमांडर हेमंत साळुंखे, आकांक्षाचे वडील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT