Sattari News: विजेचा धक्का बसून उस्तेत कामगार ठार

Electrocution in Sattari: धडीचे मळ, उस्ते - सत्तरी येथे आज दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास पोफळीच्या बागेत सुपारी काढणाऱ्या कामगाराला विजेचा धक्का बसून तो जागीच ठार झाला.
Electrocution in Sattari:
Electrocution in Sattari:Dainik Gomantak
Published on
Updated on

Electrocution in Sattari: धडीचे मळ, उस्ते - सत्तरी येथे आज दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास पोफळीच्या बागेत सुपारी काढणाऱ्या कामगाराला विजेचा धक्का बसून तो जागीच ठार झाला.

हा कामगार कुडशे - सत्तरी येथील असून सुरेश सातू सावंत (वय ३५) असे त्याचे नाव आहे.

Electrocution in Sattari:
Mapusa Municipality: म्हापशात प्रशासकीय प्रकल्प रखडला

धडीचे मळ - उस्ते येथील विश्राम गोविंद नाईक यांच्या मालकीच्या पोफळीच्या बागेत सुरेश सावंत सुपारी काढण्याचे काम करत होता.

त्यावेळी त्याच्या हातातील ॲल्युमिनियमच्या दांड्याचा स्पर्श 11 केव्ही विद्युत वाहिनीला होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. वाळपई पोलिसांनी मृतदेह गोमेकॉत पाठविला आहे.

Electrocution in Sattari:
Goa Crime News: पंजाबमधील हत्या प्रकरण; दोघा संशयितांच्या झुआरीनगरमध्ये मुसक्या आवळल्या

सत्तरीत विजेचा लपंडाव

सत्तरी तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने जोर धरलेला आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त बनले असून हे प्रकार सातत्याने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वीज खात्याची यंत्रणा दुरुस्तीचे काम करीत होती, पण नगरगाव पंचायत भागात रात्रीपर्यंत वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. गावात वीज नसल्याने सरकारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

प्रश्न जटिल

सत्तरी तालुक्यात अनेक विकासकामे झाली आहेत, परंतु वीज समस्येवर अजूनही योग्य तो तोडगा काढण्यास सरकारला गेल्या गोवा मुक्तीपासून शक्य झालेले नाही. पाणी, रस्ते, वीज या लोकांसाठी दररोजच्या मूलभूत गोष्टी आहेत.

त्या कायमच्या सोडविण्यासाठी कार्यवाही गरजेची आहे. पण वीज समस्या सत्तरीच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस जटिलच बनलेली आहे. विशेष करून बंच केबल आल्यापासून वीज समस्या अतिशय गंभीर बनत चालली आहे.

वीज समस्येला बिलांचा झटका

सरकारकडून अनेकवेळा वीज बिलांत वाढ केली जाते. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागत असते, पण वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना हाती घेताना दिसत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com