Woman Harassment  Dainik Gomantak
गोवा

Baga Resort Crime: बागा रिसॉर्टमध्ये महिलेसोबत गैरव्यवहार; तेलंगणामधील आरोपी पोलिसांच्या तावडीत

Woman Harassment at Baga: बागा समुद्रकिनाऱ्यावरील एका रिसॉर्टमध्ये महिलेसोबत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे

Akshata Chhatre

Goa Crime News: गोव्यात पर्यटकांचे प्रमाण वाढतेय, पर्यटन हा जरी गोव्याचा प्रमुख व्यवसाय असला तरी देखील पर्यटकांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे अनेकवेळा स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सोमवारी (दि. १७ डिसेंबर) रोजी तेलंगणाहून गोव्यात आलेल्या एका पर्यटकाने बागा समुद्रकिनाऱ्यावरील एका रिसॉर्टमध्ये महिलेसोबत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

तेलंगणाच्या या ५२ वर्षीय माणसाने एका महिलेचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. मधू विजय भास्कर रेड्डी असे या आरोपीचे नाव असून त्याने संध्याकाळी ४:१० च्या दरम्यान रिसॉर्टवरील रिसेप्शनच्या भागात त्याने महिलेची छेड काढायला सुरुवात केली होती.

महिलेने नकार देऊन देखील आरोपीने तिला त्याच्या खोलीत बोलावत गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेने तात्काळ या घटनेची पोलिसांमध्ये तक्रार नोंदवल्याने आरोपीला अटक करण्यात आली. सध्या पोलीस संपूर्ण घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT