कुस्तीपटू 'रेसलिंग फेडरेशन इंडिया'चे बॉस ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. देशातील दिग्गज पैलवानांना सर्व बाजूंनी पाठिंबा मिळत आहे. संगीता फोगट, विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि इतर अनेक नामांकित कुस्तीपटू या निषेध आंदोलनाचा भाग आहेत
स्वराने अॅथलीट्सला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आणि लिहिले की, 'लज्जास्पद आहे की आमच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय खेळाडूंना लैंगिक छळाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जाते, परंतु आरोपी भाजप खासदारावर काहीच कारवाई होत नाही . त्याला वाचवले जात आहे. #ISstandWithMyChampions. बडतर्फ करा आणि चौकशी करा #BrijBhushanSharanSing.'
व्हिडीओमध्ये स्वरा म्हणाली की, ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत म्हणून नाही, तर अशा कुस्तीपटूंची ही अवस्था असेल तर एका सामान्य महिला पीडितेचे काय होईल म्हणून मी त्यांना पाठिंबा देत आहे.
या खेळाडूंनी देशासाठी पदक जिंकल्यावर सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्यासोबत फोटो काढायला जातात, पण आता त्यांच्यापासून अंतर का ठेवत आहेत, असा सवालही स्वरा भास्करने केला आहे. लोकांना त्यांच्या समर्थनार्थ पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.