Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आणखी काही मंत्र्यांवर पदत्यागाची टांगती तलवार

Goa Politics: काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी काहीजणांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी काहीजणांना मंत्रिपद देण्याचा शब्द देण्यात आला होता.

त्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मला सांगितले होते.

शिवाय इतर चार-पाच मंत्र्यांनाही फोन केला होता, असे संतोष यांनी मला सांगितले होते, असा गौप्यस्फोट माजी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी केला आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या चार-पाच मंत्र्यांना संतोष यांनी फोन केला, त्यांच्यावर पदत्यागाची टांगती तलवार आहे.

यात कोणकोणत्या मंत्र्यांचा नंबर लागणार, हे गुलदस्त्यात असून याकडे गोमंतकीय जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

कुडचडे येथील भाजप मंडळाच्या वतीने कुडचडे मतदारसंघातील पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि बुथ कार्यकर्त्यांसमवेत काब्राल यांनी शनिवारी रात्री बैठक घेतली. या बैठकीत काब्राल यांनी राजीनामा देण्यामागील घटनाक्रम विस्ताराने सांगितला.

नीलेश काब्राल यांनी ज्याअर्थी ही बाब पक्षातील कार्यकर्त्यांसमोर मांडली, ती जर सत्य मानली तर संतोष यांचे चार-पाच मंत्र्यांना मंत्रिपदाचा त्याग करण्यासाठी जे फोन गेले, त्यांची खुर्ची डळमळीत झाली असेल, हे मात्र निश्‍चित.

राजकीय उलथापालथ शक्य

बांधकाम खात्यातील अभियंता भरती प्रकरणात झालेल्या कथित घोटाळ्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतल्याने काब्राल यांना मंत्रिपदापासून दूर व्हावे लागल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केले होते.

दुसरीकडे, काब्राल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विनंतीमुळे आपण पद त्यागल्याचे स्पष्टीकरण दिले.

परंतु कुडचडेत काब्राल यांनी राजीनामा प्रकरणामागील नाट्य सांगितल्यामुळे पुढील काळात राजकीय उलथापालथीची शक्यता नाकारता येत नाही.

तीन डिसेंबरनंतर हालचालींना गती

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांपैकी आलेक्स सिक्वेरा आणि संकल्प आमोणकर यांना मंत्रिपद देण्याचे निश्‍चित झाले होते.

आमोणकरांना मुख्यमंत्री सावंत यांनी बालभवनचे अध्यक्षपद दिले होते; पण त्यांनी ते नाकारले.

त्यामुळे जर त्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला असेल, तर काही झाले तरी मंत्रिपद आमोणकरांना द्यावेच लागेल. त्यासाठी आणखी एका मंत्र्याकडून राजीनामा घ्यावा लागेल, हे स्पष्ट आहे.

तीन डिसेंबरला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर आणखी काही मंत्र्यांच्या राजीनामानाट्याला सुरवात होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT