Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: उत्पलप्रश्‍नी बाजू सावरण्यावर भर...

Babush Monserrate: उत्पल मनोहर पर्रीकर यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्याचा निर्णय दिल्लीत झाला आहे

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate: उत्पल मनोहर पर्रीकर यांना भाजपमध्ये फेरप्रवेश देण्याचा निर्णय दिल्लीत झाला आहे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल, या वृत्तात अजिबात तथ्य नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आपल्याला या विषयाची काहीच कल्पना नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आठ आमदारांना प्रवेश देण्याचा निर्णयही दिल्लीत घेतला होता, त्याचीही कल्पना स्थानिक

उत्पल हे भाजपमध्ये आले तर संघटनात्मक पातळीवरील समीकरणे बदलणार, याची कल्पना असल्याने स्थानिक पातळीवर उत्पल यांचे स्वागत करण्यास अनेकजण नाखुश आहेत. उमेदवारी डोक्यात ठेवून कोणी प्रवेश करू नये, असे सांगून तानावडे हे उत्पल हे पक्षात आले तरी त्यांना पणजीतून पुढील उमेदवारी मिळेलच असे नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीआधी बरेच बदल करण्याचे दिल्लीतील नेत्यांनी ठरवले आहे. त्याची माहिती ऐनवेळी स्थानिक पातळीवर दिली जाणार आहे. यात उमेदवारीबाबत घेतलेल्या धक्कादायक निर्णयांचाही समावेश असेल, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, उत्पल यांनी सत्ताधारी गोटाशी अद्याप राजकीय चर्चा केली नसल्याचे स्पष्ट केले. मी कधीच विचारांपासून दूर गेलो नव्हतो आणि जाणारही नाही, असे उद्‍गारही त्यांनी काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT