Babush Monserrate:स्मार्ट सिटीची जबाबदारी... बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा झटकले हात

Babush Monserrate: स्मार्ट सिटीची जबाबदारी सल्लागाराचीच
Babush Monserrate:
Babush Monserrate:Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Babush Monserrate: पणजीत सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे मे महिन्याच्या 31 तारखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम माझे असल्याचे सांगत मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी, ही कामे निकृष्ट दर्जाची झाली तर त्याला सल्लागार जबाबदार आहे, कारण त्याच्यावर कोट्यवधी रुपये उधळले गेले आहेत, असे स्पष्टीकरण दिले.

Babush Monserrate:
Goa Accident Case: नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झाली भीषण अपघातांची मालिका; 14 जणांनी गमावले प्राण

सचिवालयात राज्याचे मुख्य सचिव तथा इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडटचे (आयपीएससीडीएल) चेअरमन पुनित गोयल यांच्यासमवेत मंगळवारी सकाळी ‘आयपीएससीडीएल’चे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे अभियंते, ‘आयपीएससीडीएल’चे सल्लागार आणि कंत्राटदारांची बैठक पार पडली.

आमदार बाबूश यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराला वैयक्तिक मुदत दिली आहे. सर्वप्रथम मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करून रस्ता डांबरीकरण करण्याचे काम करण्याच्या स्पष्‍ट सूचना दिल्या आहेत.

मला स्मार्ट सिटीच्या सीईओने यापूर्वी 31 मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानुसार मी ती कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करीन; परंतु कामाच्या दर्जाविषयी त्यांनी पूर्वीचीच भूमिका मांडत सल्लागाराला जबाबदार धरले. ते म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामासाठी सल्लागार नेमला आहे.

त्या सल्‍लागाराला ‘आयपीएससीडीएल’ने कोट्यवधी रुपये मोजले आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा पाहण्याचे काम त्याचे आहे. कामाचा दर्जा जर निकृष्ट असेल तर सर्वस्वी सल्लागार जबाबदार असेल, असे सांगत त्यांनी आपली बाजू सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही कंत्राटदाराला आता काम पूर्ण करण्यासाठी दिलेली तारीख पाळावीच लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Sewage Treatment Plant Progress
Vaibhavi IIT success story
Santinez Footpath Damage Panaji
Goa Assembly Election 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com