A corpse was found hanging from a tree, Police suspect suicide Dainik Gomantak
गोवा

Goa: तरुणाने लोकलज्जेस्तव केली आत्महत्या

हणजुण पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर व्रुत्तानुसार म्रुत अरबाझ अली शेख हा मुळ पंश्चिम बंगाल येथील एकोणीस वर्षीय तरुण फ्रेट्सवाडा-वेर्ला येथे राहत होते.

दैनिक गोमन्तक

शिवोली - चोरीच्या प्रकरणात सापडल्याने लोकलज्जेस्तव आत्महत्या करण्याचा बाका प्रसंग फ्रेट्सवाडा- वेर्ला येथे  भाडेकरू म्हणून राहणाऱ्या पंश्चिम बंगाल येथील अरबाझ अली शेख (19) शनिवारी रात्री आले. दरम्यान, हणजुण पोलिसांनी म्रुतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी तो  बांबोळीच्या (Bambolim) शवागारात पाठवून दिला असतां या म्रुत्युची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत अरबाझच्या जवळच्या नातेवाईकाने  म्रुतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून त्याचा म्रुतदेह  शवागारात सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी दिली.

यासंबंधात हणजुण पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर व्रुत्तानुसार म्रुत अरबाझ अली शेख हा मुळ पंश्चिम बंगाल येथील एकोणीस वर्षीय तरुण फ्रेट्सवाडा-वेर्ला येथे  समरजीत घोष (मुळ पश्चिम बंगाल) यांच्या भाड्याच्या घरात आपल्या अम्मीसमवेत राहात होते. दरम्यान, चतुर्थीच्या सातव्या दिवशी (17 सप्टेंबर )  अरबाझ अली शेख आपल्या अन्य एका साथीदारासहीत रात्री साडेतीनच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने काणकातील एका नामांकित दुचाकी शोरुममध्ये घुसून चोरीचा प्रयत्न करीत असतां,  गणपती विसर्जन करून घरी परतणाऱ्या तेथील शोरुमचे कर्मचारी तसेच स्थानिक तरुणांच्या नजरेस अरबाझ शेख यांनी शोरुमच्या बाहेर पार्क करून ठेवलेली दुचाकी दिसली, यावेळी  शोरुममधे चोरी करण्यात मग्न असलेल्या अरबाझ शेख तसेच त्याच्या मित्रास  स्थानिक तरुणांकडून  रंगेहाथ पकडण्यात आले  व चोप देण्यात आला.

दरम्यान, काणकापासून जवळच्या अंतरावर राहाणार्या अरबाझ तसेच त्याच्या मित्राने  चोरीची कबुली देत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन  देत घटनास्थळावरुन पोबारा केला, यावेळी आरबाझच्या गाडीची कागदपत्रे व दोघांचेही मोबाईल उपस्थितांनी ताब्यात घेतले. दरम्यान, घडलेल्या घटनेनंतर पहाटेच्या दरम्यान, अरबाझ शेख यांनी सहकारी मित्राला घरी सोडून  देत स्वता भरधांव वेगात निघून गेला व तेव्हापासून तो बेपत्ता होता. शनिवारी सकाळी अरबाझचा म्रुतदेह हणजुण वागातोर येथील डोंगरमाथ्यावर एका वडाच्या झाडाला लोंबकळतांना स्थानिकांना दिसला व तात्काळ हणजुण पोलिसांना. याबाबतीत कळविण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी धांव घेत म्रुतदेहाचा पंचनामा केला , यावेळी गळ्याभोवती फास  आवळल्याने अरबाझचा म्रुत्यू झाल्याची माहिती पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रविवारी दुपारी म्रुत अरबाझ शेख यांचे जवळचे नातेवाईक यांनी या म्रुत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत संध्याकाळी उशिरापर्यंत म्रुतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने पोलिसांनी म्रुतदेह बांबोळीच्या शवागारात सुरक्षित ठेवल्याचे निरीक्षक सुरज गांवस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ugvem Highway Landslide: उगवे महामार्गावर पुन्हा कोसळली दरड! आठवड्यातील तिसरी घटना; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 9चा फेरविकास अखेर रखडला, युद्धाचा फटका; 1,300 कोटींच्या निधीला केंद्राकडून नकार

Private Bus Service: मुसळधार पावसाचा फटका! गोव्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी खासगी बससेवा विस्कळीत

अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस, कांदोळी व्हिला बांधकामाविरोधातील जनहित याचिकेची दखल; यंत्रणांनाही नोटिसा

Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार भाग्यवर्धक! अनेक राशींना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा आणि धनलाभाचे प्रबळ योग

SCROLL FOR NEXT