Goa: समुद्र जीवनावर होत असलेल्या परिणामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा: लॉरेन्स

गोव्यातील (Goa) समुद्र किनाऱ्यांवर जे तेलाचे (Oil) काळे गोळे पसरले आहेत, त्यामुळे समुद्री जिवनावर व खास करुन पर्यटन क्षेत्रावर परिणाम होणारे आहे.
CM should review impact on marine life- Lawrence
CM should review impact on marine life- Lawrence Dainik Gomantak

फातोर्डा - गोव्यातील (Goa) समुद्र किनाऱ्यांवर जे तेलाचे (Oil) काळे गोळे पसरले आहेत, त्यामुळे समुद्री जिवनावर व खास करुन पर्यटन क्षेत्रावर परिणाम होणारे आहे. त्यामुळे हे प्रकरण सहज न घेता ते गंभीरपणे घ्यावे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालावे अशा आशयाचे पत्र कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याना लिहिले आहे.

हे तेल गोळे खोल समुद्रातील बोट वहातुकीमुळे झाले असल्याचा संभव असुन ते पाण्याच्या प्रवाहामुळे किनाऱ्यावर येऊन थडकले आहेत. या गोळ्यामुळे किनारे अस्वच्छ तर झाले आहेतच. शिवाय येथे राहणाऱ्या मच्छिमार लोकांना अडचणीचे झाले आहे. याच लोकांनी ही बाब सरकारच्या कानावर घालण्याची विनंती आपल्याला केली असल्याचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यानी सांगितले.

CM should review impact on marine life- Lawrence
Goa: साळ नदीला गतवैभव प्राप्त करुन देणार, आप पक्षानं जाहीरनाम्यातून केलं स्पष्ट

शिवाय समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी येणारे स्थानिक लोकांना तसेच पर्यटकांनाही हे तेल गोळे अडचणिचे वाटत आहेत असे लॉरेन्स यानी सांगितले. दर वर्षी मे त ऑक्टोबर  महिन्यांदरम्यान हे गोळे किनाऱ्यावर एकत्र होतात. त्यामुळे पाणी अस्वच्छ होते. गोव्यातील बाणावली, कोलवा, अंजुणा, मोरजी, कळंगुट,वेळसाव या किनाऱ्य़ांना काळ्या रंगाचे स्वरुप प्राप्त होते असे आमदाराने सांगितले.

हे तेल गोळे गोव्यासाठी वरदान नसुन एक प्रकारचे संकट आहे. या काळ्या तेल गोळ्यात विषारी धातु व हायड्रोकार्बन सारखे पदार्थ असतात जे त्वचा व डोळ्यांसाठी अपायकारक ठरु शकतात असेही रेजिनाल्ड लॉरेन्स यानी सांगितले.

या सर्व प्रकारावर परिणामकारक उपाय शोधणे गरजेचे असल्याचेही आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com