Sexual Assault cases in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : मुलीचे लैंगिक शोषण करणारा पिता फरारी; आईला होती माहिती

जुने गोवे पोलिसांकडून शोध जारी; अनेक वर्षे छळवणूक

दैनिक गोमन्तक डिजिटल

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नराधम पित्याविरुद्ध जुने गोवे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयित पित्याचा गेल्या काही दिवसांपासून शोध घेत आहेत.

मात्र, अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिस चौकशी करत आहेत.

पीडित मुलीने यावर्षी दहावीची परीक्षा दिली आहे. मुलीने दिलेल्या जबानीत पित्याने अनेकदा लैंगिक शोषण केल्याची माहिती आईला दिली होती. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बालकल्याण समितीने सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संशयित पिता अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत होता, हे तिच्या आईला माहीत होते. मात्र, पतीच्या धाकाला घाबरून ती गप्प राहिली होती.

गैरकृत्यावर पांघरूण

पीडित मुलगी पित्याकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणामुळे एकदा आजारी पडली होती. त्यावेळी तिला पणजीतील एका क्लिनिकमध्ये नेले होते. या क्लिनिकमध्ये तपासणीवेळी तिचे लैंगिक शोषण झाल्याचे उघडकीस आले होते. तेथील डॉक्टर्सना ती विवाहित असल्याचे सांगून कुटुंबाने त्यावर पांघरूण घातले होते.

आईचेही मौन

पीडितेला घराबाहेर जाण्यास किंवा शेजाऱ्यांशी बोलण्यास वडिलांनी निर्बंध घातले होते. तिची आई पतीला घाबरत होती. अखेर पित्याच्या शोषणाला कंटाळून पीडितेनेच सुटका करून घेण्यासाठी पुढाकार घेत हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणाला तिची आईसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. त्यामुळे आईला पोलिसांनी तक्रारदार केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT