Querim Beach : सेल्फीच्या नादात चौघे बुडाले; केरी-पेडणेतील दुर्घटना

आपदग्रस्त कांदोळीतील; दोघांचे मृतदेह मिळाले, दोघांचा शोध सुरू
Four people drowned at Keri beach
Four people drowned at Keri beachDainik Gomantak
Published on
Updated on

सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात यापूर्वी अनेकांचे वेगवेगळ्या दुर्घटनांत बळी गेले आहेत. असे असले, तरी हे फॅड कमी होताना दिसत नाही. रविवारी कांदोळी येथून 23 जणांचा गट केरी-पेडणे येथे फिरायला गेला असता, समुद्र किनाऱ्यावर सेल्फी काढण्याच्या नादात समुद्राच्या लाटेत चौघेजण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरू आहे.

याबाबत ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, 23 रोजी केरी-पेडणे येथे 23 जणांचा एक गट कांदोळी येथून फिरण्यासाठी आला होता. त्यातील चौघेजण सेल्फी काढत असताना समुद्राच्या जोरदार लाटेमध्ये वाहून गेले. या चौघांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे.

Four people drowned at Keri beach
Querim Beach: पीडितांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री वाढदिवस सोहळा रद्द करतील ? - पणजीकर

त्यापैकी महंमद बकिर अली (वय 24 वर्षे) आणि शकीना खातून (18) यांचे मृतदेह सापडले असून अन्य दोघांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या मृतदेहांचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. महंमद अली आणि शकीना खातून यांचे मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉत पाठवण्यात आले आहेत.

शोध पथकाला मृतदेह शोधताना अडचणी येत असल्याने शोध मोहीम थोडी लांबली आहे. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी पेडणेचे पोलिस निरीक्षक दत्ताराम रावत, मोपा पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर, लाईफ गार्ड आणि इतर अधिकारी घटनास्थळी होते.

समुद्र किनाऱ्यावर दोन जीवरक्षक होते, पण...

या किनाऱ्यावर दोन जीवरक्षक होते. मात्र, ते या घटनास्थळापासून दूर होते. ते किनाऱ्यावरून अपघातस्थळी पोहोचेपर्यंत ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. हा समुद्र किनारा पोहण्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही. तसा या ठिकाणी फलकही लावलेला आहे.

स्थानिकांना याची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी विदेशी पर्यटक येथे बुडून मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही हे युवक तेथे गेले आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली.

Four people drowned at Keri beach
Siolim fire: शिवोलीत अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे दुर्घटना टळली, आंब्याच्या झाडाला लागलेली आग आटोक्यात

प्रयत्न अयशस्वी

सेल्फी काढताना अचानक जोरदार लाट आल्यामुळे आणि वाराही असल्याने चौघेजण लाटेबरोबर पाण्यात वाहून गेले. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी वासिफ खातून याने पाण्यात उडी मारली. मात्र, त्याला त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

बुडणाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात तो अस्वस्थ झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या किनाऱ्यावर यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. येथे पाण्यात भोवरे निर्माण होतात. त्यामुळे तेथे जाऊन नये, असा फलक लावला आहे, तरीही ते युवक तेथे गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com