Goa Mining : 'या' सात खाण ब्लॉक्सचा लवकरच होणार लिलाव

कुडचडे, सावर्डे, सांगे, केपेत होणार लाभ
Goa Illegal Mine
Goa Illegal MineDainik Gomantak

पुढील महिन्यात होणाऱ्या खनिज लिलावाच्या तिसऱ्या फेरीत राज्य सरकारने दक्षिण गोव्यातील सात खाणींचे ब्लॉक्स निश्चित केले आहेत. त्यात दक्षिण गोव्यातील कुडचडे, सावर्डे, सांगे आणि केपे या भागांतील खाण व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे खनिज व्यावसायिकांमध्ये खुशीचे वातावरण असले तरी पर्यावरणप्रेमींसाठी तो चिंतेचा विषय ठरणार आहे.

खाण व भूगर्भ संचालनालयाने तिसऱ्या टप्प्याच्या खनिज ब्लॉक्स लिलावासाठी ही फाईल राज्य सरकारकडे पाठवली आहे. यापूर्वी नऊ खनिज ब्लॉक्स लिलावासाठी ठेवले होते. त्यापैकी आठ उत्तर आणि एक दक्षिण गोव्यात होते.

Goa Illegal Mine
Querim Beach : सेल्फीच्या नादात चौघे बुडाले; केरी-पेडणेतील दुर्घटना

आता दक्षिण गोव्यातील आणखी सात खनिज ब्लॉक्सचा लिलाव होणार असल्याने, दोन्ही जिल्ह्यांमध्ये लिलावासाठी निश्चित केलेल्या ब्लॉक्सची संख्या समान होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी राज्य सरकार 25 खनिज ब्लॉक आणि डंपचा लिलाव करणार, असे जाहीर केले होते. अर्थसंकल्पात सावंत यांनी लिलावानंतर लोहखनिज उत्खनन पुन्हा सुरू करून एक हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. खाणकाम पुन्हा सुरू झाल्याने राज्यात रोजगार निर्माण होईल, असे सावंत त्यावेळी म्हणाले होते.

Goa Illegal Mine
High Court of Bombay at Goa: कुंकळ्ळी पालिका मुख्‍याधिकाऱ्यांची न्यायालयाने केली कानउघाडणी

88 खाण लीजांचे नूतनीकरण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मार्च 2018 मध्ये गोव्यातील खाणकाम थांबले होते.

निविदा मागवल्या

सध्या अडवलपाल-थिवी खनिज ब्लॉकचा लिलाव झाला असून तो फोमेंतो कंपनीला मिळाला आहे.या ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केल्यानंतर राज्याने उत्तर गोव्यातील आणखी पाच लोहखनिज ब्लॉक्ससाठी निविदा मागवल्या. यामध्ये अडवलपाल-थिवी व्यतिरिक्त कुडणे-करमळे, कुडणे, थिवी-पिर्णा आणि सुर्ला-सोनशी येथील ब्लॉक्सचा त्यात समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com